Narendra Modi on Goa | ‘पटेल असते तर गोवा आधीच मुक्त झाला असता’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडिअममध्ये गोव्यातील जनतेला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलंय.

Narendra Modi on Goa | 'पटेल असते तर गोवा आधीच मुक्त झाला असता' - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 6:32 PM

पणजी : गोवा मुक्तिदिनी (Goa Liberation Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. जर सरदार वल्लभभाई पटेल आणखी काही काळ जिवंत असते, तर कदाचित गोवा आणखी लवकर मुक्त झाला असता, असं विधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडिअममध्ये गोव्यातील (Goa) जनतेला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलंय.

गोव्यातील जनतेला मोदी संबोधित करताना

कधी झाला होता गोवा मुक्त?

गोवा 19 डिसेंबर 1961 रोजी मुक्त झाला होता. त्यासाठी गोवा मुक्तीचा लढाही देण्यात आला होता. या मुक्तिसंग्राम लढ्यात 31 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांचीही आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काढली. दरम्यान, गोवा 1961 आधीच मुक्त होऊ शकला असता, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. जर सरदार वल्लभभाई पटेल आणखी काही काळ जिवंत असते, तर गोवा मुक्त व्हायला इतका वेळ कधीच लागला नसता, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

कोकणीतून जिंकली गोंयकरांनी मनं

गोवा मुक्तिदिनाच्या हीरक महोत्सव पणजीसह संपूर्ण राज्यात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुक्तिदिनानिमित्त गोव्यात हजेरी लावत गोव्यातील जनतेला संबोधित केलंय. गोव्याची राजभाषा असलेल्या कोकणीतून आपल्या संबोधनाची सुरुवात करण्याआधी मोदींनी वेगवेगळ्या प्रकल्पांचंअनावरण केलं. मोदींनी गोव्यासाठी 60व्या मुक्तिदिनानिमित्त तब्बल 600 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ गोव्यात केल्याचा दावा केलाय. यात आग्वाद किल्यातील संग्रहालय, गोवा मेडिकल कॉलेजमधील सुपर स्पेशालिटी ब्लॉक, दक्षिण गोव्यातील नव्या जिल्हा रुग्णालयासह मोपा विमानतळातील कौशल्य विकास केंद्र आणि दवर्ली, नावेलीसह मडगावातील गॅस इन्सुलेटेड उपकेंद्राचंही उद्घाटन केलं.

पर्रीकरांच्या आठवणींना उजाळा

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी गोवा मुक्तीलढ्या भाग घेतलेल्या आणि बलिदान दिलेल्या 31 हुतात्म्यांचीही आठवण काढली. तसंच यावेळी त्यांनी दिवंगत मनोहर पर्रीकरांच्या आठवणींनाही उजाळा दिलाय. पर्रीकरांनी गोव्याची क्षमता,गोव्याचा विकास यावर मोलाचं काम केल्याचं मोदींनी यावेली म्हटलंय. गोव्यातील लोकं किती मेहनती, प्रतिभावान आणि प्रामाणिक असल्याची प्रतिमा संपूर्ण देशानं पर्रीकरांमध्ये पाहिली आहे, असंही त्यांनी नमूद केलंय.

पाहा मोदींच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडीओ –

संबंधित बातम्या – 

Goa Liberation Day | गोवा आज 60वा मुक्तिदिन साजरा करतंय, पण खरंच गोवा मुक्त झालाय का?

60व्या मुक्तिदिनी गोव्याला पंतप्रधानांनी दिलं 600 कोटीचं गिफ्ट, गोव्याला उद्देशून मोदी म्हणाले की…

आमदारांना चारचाकीसाठी 30 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज, सर्वसामान्यांना मात्र साडे आठ टक्क्याचा व्याजदर!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.