आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीचे पंतप्रधानांच्या हस्ते केदारनाथमध्ये अनावरण, 82 तीर्थक्षेत्री कार्यक्रम होणार

भाजपा प्रदेश अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले हे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत. तसेच राज्यात होणाऱ्या कार्यक्रमांची ठिकाणे आणि उपस्थित राहणारे मान्यवर याची माहिती मिळालीय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्र्यंबकेश्वर येथे उपस्थित राहणार आहेत.

आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीचे पंतप्रधानांच्या हस्ते केदारनाथमध्ये अनावरण, 82 तीर्थक्षेत्री कार्यक्रम होणार
PM Narendra Modi
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 10:28 PM

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर 5 नोव्हेंबरला श्रीक्षेत्र केदारनाथ येथे श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या समाधीचे आणि मूर्तीचे अनावरण होणार आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते केदारनाथ धाम येथे झालेल्या 200 कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन तर 200 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजनही होणार आहे. या कार्यक्रमानिमित्ताने आद्य शंकराचार्यांनी ज्या तीर्थक्षेत्रांना पदस्पर्श केला, तसेच 12 ज्योतिर्लिंग अशा देशभरातील 82 तीर्थक्षेत्री भारतीय जनता पार्टीतर्फे देशव्यापी कार्यक्रम होणार आहेत.

औंढा नागनाथ, पंढरपूर, माहूर, कोल्हापूर, तुळजापूर येथे कार्यक्रम होणार

राज्यात या निमित्ताने त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाशंकर, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ तसेच पंढरपूर, माहूर, कोल्हापूर, तुळजापूर येथे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार आदी सहभागी होणार आहेत, अशी माहिती भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या ठिकाणी भजन, नाम संकीर्तन, आरती, साधू महंतांचा सत्कार असे कार्यक्रम होणार आहेत.

आचार्य तुषार भोसले हे या कार्यक्रमाचे संयोजक

भाजपा प्रदेश अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले हे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत. तसेच राज्यात होणाऱ्या कार्यक्रमांची ठिकाणे आणि उपस्थित राहणारे मान्यवर याची माहिती मिळालीय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्र्यंबकेश्वर येथे उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, कपिल पाटील, खा. डॉ. प्रीतम मुंडे त्र्यंबकेश्वरमध्ये उपस्थित असतील. केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, डॉ. भागवत कराड, विजयाताई रहाटकर, भाजप प्रदेश सरचिटणीस आ. अतुल सावे, आ. हरीभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब, लक्ष्मण औटे पाटील, आध्यात्मिक आघाडी संयोजक संजय जोशी हे श्री क्षेत्रघृष्णेश्वर येथे उपस्थित राहतील.

माजी मंत्री संजय भेगडे हे भीमाशंकर येथे उपस्थित राहणार

तसेच माजी मंत्री संजय भेगडे हे भीमाशंकर येथे उपस्थित राहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील जगद्गुरू शंकराचार्य मठ कोल्हापूरला उपस्थिती दर्शवणार आहेत, खा. प्रताप पाटील चिखलीकर, व्यंकटराव गोजेगावकर हे माहूर येथे उपस्थित राहतील. खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, आ. समाधान अवताडे, आ. प्रशांत परिचारक हे पंढरपूर येथे उपस्थित राहतील. राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे परळी वैजनाथमध्ये उपस्थिती दर्शवतील.

संबंधित बातम्या

देशातील भटक्या जमातींना ओबीसीबाहेर आरक्षण देण्याचा विचार सुरू, रामदास आठवलेंची माहिती

‘फडणवीसांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्यापेक्षा दिल्लीत जाऊन लोकांसाठी तोंड उघडावं’, रोहित पवारांची खोचक टीका

'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.