भाजपच्या 4 महिला आमदारांची आर्थिक फसवणूक करणारे ‘बंटी आणि बबली’ जेरबंद, त्यांनी आमदारांनाच का गंडवलं?

फसवणूक झालेल्या आमदारांमध्ये भाजपच्या माधुरी मिसाळ (Madhuri Misal), मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे आणि श्वेता महाले (Shweta Mahale) यांचा समावेश आहे. अटक करण्यात आल्यानंतर आरोपीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचीही फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.

भाजपच्या 4 महिला आमदारांची आर्थिक फसवणूक करणारे 'बंटी आणि बबली' जेरबंद, त्यांनी आमदारांनाच का गंडवलं?
भाजपच्या 4 महिला आमदारांची आर्थिक फसवणूकImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 2:16 PM

पुणे : ‘आई आजारी आहे, मला पैशाची गरज आहे’, असं कारण सांगून भाजपच्या चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. त्यानंतर गुरुवारी लगेच बिबवेवाडी पोलिसांनी (Bibwewadi Police) दोन आरोपींना अटक केलीय. मुकेश राठोड आणि सुनिता क्षीरसागर अशी या आरोपींची नावं आहेत. फसवणूक झालेल्या आमदारांमध्ये भाजपच्या माधुरी मिसाळ (Madhuri Misal), मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे आणि श्वेता महाले (Shweta Mahale) यांचा समावेश आहे. अटक करण्यात आल्यानंतर आरोपीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचीही फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी मुकेशला औरंगाबादवरुन अटक केलीय.

माधुरी मिसाळ यांनी सांगितल्यावर अन्य आमदारांनाही समजलं!

आमदार माधुरी मिसाळ यांना फोन करुन आरोपीने आपलं नाव मुकेश राठोड असं सांगितलं. आई बाणेरच्या रुग्णालयात दाखल असून उपचारांसाठी पैशाची गरज आहे. त्यासाठी आपल्या गुगल पे नंबरवर 3 हजार 400 रुपये पाठवण्याची विनंती त्याने केली. आमदारांनीही मुकेशला पैसे पाठवले. त्यानंतर माधुरी मिसाळ मुंबईत कामानिमित्त गेल्या असता त्यांच्या सहकारी आमदार देवयानी फरांदे, मेघना बोर्डीकर, श्वेता महाले यांचीही आरोपीने फसवणूक केल्याचं समोर आलं. संपूर्ण प्रकार उघड झाल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली, त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

MPSC ची तयारी करणारे बंटी-बबली!

आरोपी मुकेश राठोड हा किनगाव, जिल्हा बुलडाणा इथला रहिवासी आहे. त्याचं शिक्षण बीए इंग्रजीपर्यंत झालं आहे. तर सुनिता कल्याण क्षीरसागर हिने बीएस्सी पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. सुनिता ही औरंगाबादचीच रहिवाशी आहे. हे दोघेही गेल्या तीन वर्षापासून MPSCचा अभ्यास करत आहेत. त्यांना खर्चासाठी पैसे हवे होते. आमदार मंडळी वैद्यकीय खर्चासाठी मदत करतात हे माहिती असल्यानं या दोघांनी आमदारांना खोटं सांगून पैसे घेतले. घरुन पैसे मिळत नसल्यानं खर्च भागवण्यासाठी या दोघांनी आमदारांकडूनच पैसे गोळा केल्याचं आता उघड झालंय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.