मुनगंटीवार स्वत:साठी शिवसेनेकडे फिल्डींग लावतायत? फडणवीसांची भूमिका काय?

शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू नाही. शिवसेना आणि भाजपचं पुढे काय होतं ते बघू, असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांच्या या विधानाचे अर्थ काय होतात अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

मुनगंटीवार स्वत:साठी शिवसेनेकडे फिल्डींग लावतायत? फडणवीसांची भूमिका काय?
सुधीर मुनगंटीवार, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 8:53 PM

मुंबई : भाजपचे राज्यातील मोठे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. महत्वाची बाब म्हणजे या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेनंतर शिवसेना हा अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू नाही, असं वक्तव्य केलं आहे. आता मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात असल्याचं पाहायला मिळत आहे.(Sudhir Mungantiwar met Chief Minister Uddhav Thackeray, what’s the reason?)

शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू नाही. शिवसेना आणि भाजपचं पुढे काय होतं ते बघू, असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांच्या या विधानाचे अर्थ काढायला आता सुरु झाली आहे. त्याचबरोबर बैठकीत फक्त मतदारसंघातील विकास कामांबाबत चर्चा झाली. तसंच चंद्रपूर विमानतळासंदर्भातही चर्चा झाल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

एकीकडे मेट्रो प्रकल्प, शेतकरी आंदोलन, वाढीव वीज बिल अशा अनेक मुद्द्यांवरुन भाजपकडून सत्ताधारी शिवसेनेला आणि खास करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरण्याची एकही संधी सोडली जात नाही. तिथे मुनगंटीवार यांनी अचानकपणे उद्धव ठाकरे यांनी भेट घेतल्यानं अनेकांना प्रश्न पडला आहे. भाजप-शिवसेनेचे अनेक नेतेही या भेटीबाबत आश्चर्य व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. तर राजकीय विश्लेषकही या भेटीचं कारण आणि अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोक तर मुनगंटीवार स्वत:साठी फिल्डिंग लावत आहेत का? असाही प्रश्न विचारत आहेत.

राजकीय विश्लेषकांचं मत काय?

राजकारणात कुणीही कुणाचा कायम शत्रू नसतो. त्या-त्या राजकीय परिस्थितीनुसार नेतेमंडळी एकमेकांवर टीका किंवा एकमेकांचं कौतुक करत असतात. राजकारणापलिकडे जाऊन काही नेत्यांची चांगली मैत्री असल्याची अनेक उदाहरणं आहेत. दुसरी गोष्टी अशी की मुनगंटीवार यांनी हेच म्हटलं आहे की, राजकारणामध्ये आमचं शिवसेनेशी टोकाचं वैर नाही. त्यामुळे कुठेतरी काही नेत्यांनी संवाद करत राहायचं, काही नेत्यांनी प्रहार करत राहायचं, हा स्ट्रॅटेजीचा भाग असतो. पण सध्यातरी शिवसेनेनं सध्यातरी काँग्रेस, शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करुन ती चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आताच राजकारणात काही बदल घडेल, असं आपल्याला वाटत नसल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी व्यक्त केलं आहे.

मुख्यमंत्र्यांना कुंभकर्णाची उपमा

यापूर्वी अनेकदा मुनगंटीवार यांनी विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेरही मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलेली आहे. ‘कुंभकर्ण आज असता तर आत्महत्या केली असती की आमच्यापेक्षाही कुणी मोठा भाऊ आहे’ अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज्यात कोरोनापासून ते मराठा आरक्षण आणि वाढील वीजबिलाविरोधात विरोधक पेटून उठले आहे. याच मुद्द्यांवर सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर टीका केली होती. गजनीच्या हिरोसारखा या सरकारला पॅालीटीकल अल्झायमर झाला आहे. या सरकारविरोधात संधी मिळेल तिथे जनतेनी असंतोष व्यक्त करा असंही यावेळी मुनगंटीवार म्हणाले. इतकंच नाही तर ‘फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचे सरकार आले’ असं म्हणत मुनगंटीवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’वरुन मुख्यमंत्र्यांची खिल्ली

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात सुधिर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला होता. माझे कुटुंब, माझी जबाबदारीवरुनही मुनगंटीवारांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला होता. माझे कुटुंब, माझी जबाबदारी, माझे पेपर, माझी मुलाखत, माझे पोलीस आणि माझा एफआयआर, असं म्हणत मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली होती.

मुनगंटीवार-मुख्यमंत्री भेटीवर फडणवीसांची भूमिका काय?

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुनगंटीवार यांनी आपल्या मतदारसंघातील विकास कामांबाबत ही भेट असल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर चंद्रपूरच्या विमानतळाबाबतही या भेटीत चर्चा झाल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. दरम्यान भाजपचा एखादा मोठा नेता जेव्हा एखाद्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडतो, तेव्हा ती पक्षाची भूमिका असते, असं सांगितलं जातं. म्हणजे भाजपचे नेते हे विचार विनियम करुनच भूमिका मांडत असतात, असं भाजप नेतेच वारंवार सांगतात. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही भूमिका मुनगंटीवारांच्या वक्तव्याप्रमाणेच असेल हे नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या :

शिवसेना अंतिम श्वासापर्यंत शत्रू नाही, पुढे बघू काय होतंय; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मुनगंटीवारांचे वक्तव्य

‘मोठा भाऊ पाहून कुंभकर्णानेही आत्महत्या केली असती, मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Sudhir Mungantiwar met Chief Minister Uddhav Thackeray, what’s the reason?

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.