खडसे ते बोंडे, ‘त्या’ केबिनमध्ये राजकीय कारकीर्दीची अखेर, मंत्रालयात राजकीय अंधश्रद्धा

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय अंधश्रद्धेवर (political superstition in mantralay) मोठी चर्चा सुरु आहे.

खडसे ते बोंडे, 'त्या' केबिनमध्ये राजकीय कारकीर्दीची अखेर, मंत्रालयात राजकीय अंधश्रद्धा
Follow us
| Updated on: Dec 30, 2019 | 8:33 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय अंधश्रद्धेवर (political superstition in mantralay) मोठी चर्चा सुरु आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील कृषी मंत्रालयाच्या केबिनमध्ये ज्या नेत्याची वर्णी लागते, त्याची राजकीय कारकीर्द (political superstition in mantralay) संपुष्टात येते, अशी चर्चा सध्या मंत्रलयात रंगत आहे. त्यामुळे आता कृषी मंत्रिपद नेमकं कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर 2014 मध्ये कृषीमंत्री आणि महसूल मंत्री म्हणून एकनाथ खडसे यांनी पदभार स्वीकारला होता. त्यानंतर दोनच वर्षात ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर 2017 मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांनी कृषी मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. मात्र वर्षभरातच त्यांचा आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाला. पांडुरंग फुंडकरांनंतर भाजपचे विदर्भाचे आमदार अनिल बोंडे यांची कृषीमंत्री पदी वर्णी लागली. पण त्यानंतर अनिल बोंडे यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या देवेंद्र भुयार यांच्याकडून पराभव झाला. त्यामुळे आता कृषीमंत्री पद पुन्हा रिकामे झाले आहे.

भाजप सरकारच्या कार्यकाळात आतापर्यंत जे कुणी कृषीमंत्री पदावर आले आहेत. त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी ते पद सोडावे लागत आहे. तसेच त्यांची राजकीय कारकीर्द संपत आहे, अशी चर्चा सध्या मंत्रालयात सुरु आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.