मनसे नेते गजानन काळे यांच्या अटकेची शक्यता, महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून गृहमंत्र्यांची भेट

महाविकास आघाडीतील महिला पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आता गजानन काळे यांना अटक होण्याची शक्यता आहे. तशी माहिती नवी मुंबई पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महिला पदाधिकारी गजानन काळे यांच्या अटकेसाठी आक्रमक झाल्या आहेत.

मनसे नेते गजानन काळे यांच्या अटकेची शक्यता, महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून गृहमंत्र्यांची भेट
गजानन काळे, मनसे पदाधिकारी
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 4:02 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नीने केलेल्या गंभीर आरोपानंतर आता त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसंच पोलीस सेटलमेंटसाठी दबाव टाकत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. त्यानंतर आता गजानन काळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी गृहमंत्र्यांनी या महिलांशी चर्चा केली. (Possibility of arrest of MNS leader Gajanan Kale, Mahavikas Aghadi women office bearers meets home minister)

महाविकास आघाडीतील महिला पदाधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आता गजानन काळे यांना अटक होण्याची शक्यता आहे. तशी माहिती नवी मुंबई पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महिला पदाधिकारी गजानन काळे यांच्या अटकेसाठी आक्रमक झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या 10 ते 15 महिलांनी आज गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी आयुक्तालयात दाखल झाल्या होत्या. मात्र, मोजक्या महिलांनाच यावेळी गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी परवानगी देण्यात आली.

गजानन काळे यांच्या पत्नीकडून कोणते खळबळजनक आरोप?

“2008 साली आमचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला. आम्ही कॉलेजात एकत्र होतो. आमची चांगली मैत्री होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पुढे त्याने मला लग्नाची मागणी घातली. मी आमच्या बौद्ध धर्मातल्या मुलाशी लग्न करणार असल्याचं त्याला सांगितलं. ‘मी बौद्ध धर्म स्वीकारतो, पण माझ्याशी लग्न कर’, असं त्याने मला सांगितलं. घरच्यांच्या संमतीने आम्ही लग्न केलं. लग्नानंतरच्या केवळ 15 दिवसांनी गजानन माझ्यासोबत किरकोळ कारणांवरुन भांडण करु लागला. माझा सावळा रंग व माझी जात याच्यावरुन तो मला टोमणे मारू लागला. जातीवाचक शिवीगाळ करु लागला… मारहाण करु लागला”

घरगुती वाद आणि मारहाणीचा आरोप

“तो मला कायम बोलायचा की, तू सावळी आहेस… तुझी जात वेगळी आहे… तरी देखील मी तुझ्याशी लग्न केले आहे. माझी चूक झाली. तुझ्या वडिलांची पोस्ट (हुद्दा) बघून मी तुझ्याशी लग्न केले, परंतु त्याचा मला काही एका फायदा झाला नाही, असं तो वारंवार बोलायला. तेव्हा आमच्या दोघांमध्ये या कारणांवरुन बऱ्याच वेळा भांडण झालं… जेव्हा जेव्हा भांडण होई त्यावेळी गजानन मला मारहाण करत असे. मग मी माहेरी जायचे. पुन्हा काही दिवस उटल्यानंतर गजानन मला फोन करुन माझी माफी मागायचा. पुन्हा असं होणार नाही, असं सांगून मला घरी आणायचा. पण काही दिवस सरले की त्याचं नाटक पुन्हा सुरु व्हायचं”, असंही त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

सेटलमेंटसाठी दबाव टाकल्याचा आरोप

संजीवनी काळे यांनी पोलिसांनी आपल्यावर सेटलमेंटसाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. “त्यावरुन हे काय चाललंय राज्यात?” असा सवाल चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना विचारला आहे. “नमस्कार चित्राताई, मी संजीवनी गजानन काळे, मी 11 तारखेला माझे पती गजानन काळेंवर एफआयआर दाखल केली होती, तीन दिवस उलटून झाले आहेत, तरीसुद्धा त्यांना अरेस्ट झालेली नाही, मला न्याय मिळालेला नाही, मी पोलिसांकडे गेले होते काल, तर पोलिसांनी माझ्यावर प्रचंड मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला, सेटलमेंट करण्याचा विषय झाला” असं संजीवनी काळे व्हिडीओमध्ये म्हणतात.

संबंधित बातम्या :

अनेक स्त्रियांशी संबंध, जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण, मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप

आधी विवाहबाह्य संबंधाचा दावा, आता आणखी एक गंभीर आरोप, गजानन काळेंच्या पत्नीने वात पेटवली

Possibility of arrest of MNS leader Gajanan Kale, Mahavikas Aghadi women office bearers meets home minister

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.