राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेत शरद पवार स्पष्टच बोलले…

Ajit Pawar and Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवार यांनी आपला दावा केला आहे. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी अजित पवार यांचा दावा खोडून काढला. तसेच जे गेले आहेत, त्यांच्यांवर कारवाई होणार असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेत शरद पवार स्पष्टच बोलले...
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 5:38 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. अजित पवार यांनी पक्ष अन् चिन्हावर आपला दावा केला. त्यावर शरद पवार यांनी आपले मत मांडले. तसेच प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेत त्यांनी भूमिका मांडली. अजित पवार यांच्या जाण्यापेक्षा प्रफुल्ल पटेल गेल्याचे दु:ख शरद पवार यांना जाणवत होते. पक्षातून जे गेले आहेत, त्यांच्यांवर कारवाई करण्याचे संकेत शरद पवार यांनी दिले.

काय म्हणाले शरद पवार

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली होती. परंतु त्यांनी पक्षाध्यक्षाच्या मार्गदर्शक सूचना मोडल्या. त्यांनी चुकीचं पाऊल उचललं आहे. आता त्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही. यामुळे त्यांनी पदावरून बाजूला व्हावे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

पर्याय उभे करणार

राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रकरणानंतर देशाच्या कान्याकोपऱ्यातून आपणास फोन येत आहे. अनेक जणांनी या परिस्थितीत आपण सगळे एक आहोत, आमची तुम्हाला साथ आहे, अशी मते मांडले, असे शरद पवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी ममता बॅनर्जी यांचा फोन आला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीसुद्धा माझ्याकडून सर्व घडामोडींची माहिती घेतली. आम्ही सगळे सोबत आहे असे त्यांना सांगत आपण भाजपला एक पर्यायी शक्ती देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपला पक्ष पुन्हा उभा करणार असल्याचा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. १९८० मध्ये निवडून आलेले सर्व लोक बाहेर पडले होते. आम्ही फक्त पाच जण होतो, त्यानंतर पक्ष उभा केल्याची आठवण त्यांनी करुन दिली.

डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.