BIG BREAKING | पडद्यामागे हालचाली वाढल्या, नवाब मलिकांसाठी 2 मोठ्या भेटी, काय घडतंय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास देवेंद्र फडणवीस यांनी विरोध दर्शवलाय. त्यामुळे नवाब मलिक नेमकं कोणत्या पक्षासोबत आहेत? याबाबतचा प्रश्न पुन्हा उपस्थित होतोय. अजित पवार गटाकडून उघडपणे काही बोललं जात नाहीय. पण नवाब मलिकांच्या मुद्द्यावरुन आज दोन मोठ्या भेटी घडून आल्याची माहिती समोर आली आहे.

BIG BREAKING | पडद्यामागे हालचाली वाढल्या, नवाब मलिकांसाठी 2 मोठ्या भेटी, काय घडतंय?
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 5:32 PM

नागपूर | 8 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे जोरदार हालचाली सुरु आहेत. नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरुन दोन मोठ्या भेटीगाठी आज घडून आल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची आज भेट घडून आली आहे. या भेटीत नवाब मलिक यांच्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रफुल्ल पटेल यांना आपल्या पत्राबाबत सांगितलं. आम्ही आमची भूमिका मांडली. तुम्ही पुढे ठरवा, असं फडणवीसांनी प्रफुल्ल पटेल यांना भेटीत सांगितल्याची माहिती सूत्रांना दिली आहे.

अजित पवारांकडून मलिकांना वेट अँड वॉचचा सल्ला

दुसरीकडे अजित पवार आणि नवाब मलिक यांचीदेखील भेट घडून आली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली. मलिकांवरुन सुरु असलेल्या वादावर यावेळी चर्चा झाली. अजित पवारांकडून मलिकांना वेट अँड वॉचचा सल्ला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे अजित पवार आणि नवाब मलिक यांची भेट झाली त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते.

प्रफुल्ल पटेलांनी फडणवीसांना काय सांगितलं?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या पक्षाची भूमिका मांडली आहे. मलिकांनी अद्याप भूमिका जाहीर केलं नसल्याचं पटेल म्हणाले. मलिकांच्या भूमिकेआधी आम्ही भूमिका घेणं योग्य नसल्याचं पटेलांनी सांगितलं. आमदार म्हणून मलिकांना सभागृहात बसण्याचा अधिकार आहे, असंही पटेल यावेळी म्हणाले.

विधानसभा अध्यक्षांनी मलिकांना अजित पवारांच्या मागची खुर्ची दिलेली?

“मलिकांना विधानसभा अध्यक्षांनी 49 नंबरची जागा दिलीय. पण विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या खुर्चीवर न बसता मलिक शेवटच्या बाकावर बसले. कारण अध्यक्षांच्या वतीने देण्यात आलेली खुर्ची ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागे होती. मात्र मलिकांनी आपली भूमिका जाहीर न केल्यामुळे ते त्या जागेवर बसलेच नाही. मलिकांनी आपली भूमिका घेतली असती तर आम्हीदेखील आमची भूमिका जाहीर केली असती”, असं पटेलांनी फडणवीसांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.