AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना नेतृत्व, ना दूरदृष्टी, ना निर्णय क्षमता, महाविकास आघाडीकडे काहीच नाही : प्रकाश आंबेडकर

"देश पातळीवर राजकीय नेतृत्व नाही, हे कोरोना संकंट काळात दिसून आलं आहे. तीच गत महाराष्ट्राची झाली आहे", अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली (Prakash Ambedkar slams Thackeray government).

ना नेतृत्व, ना दूरदृष्टी, ना निर्णय क्षमता, महाविकास आघाडीकडे काहीच नाही : प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Jun 15, 2020 | 9:42 PM

पुणे :राज्यात शाळा चालू करायच्या की नाही? हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून अधांतरी होता (Prakash Ambedkar slams Thackeray government). मात्र आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय जिल्हा प्रशासनावर ढकलून दिला. याचाच अर्थ यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता नाही. राजकीय नेतृत्व नाही, दूरदृष्टी नाही आणि बेभरवशावरती हे राज्य सोडून दिले आहे. हीच अवस्था ‘जाणता राजा’ची पण आहे” अशी खरमरीत टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली (Prakash Ambedkar slams Thackeray government).

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली आहे. ऑनलाईन, डिजीटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर शाळा सुरु करण्यात येणार आहे. तसंच ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही त्या ठिकाणी पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा उघडता येतील, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. याच निर्णयावर प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली.

“केंद्रात मोदी नेतृत्व करु शकत नाही ते निर्णय घेऊ शकत नाही, आपले निर्णय राज्यावर सोडून देतात आणि राज्यातले लोक जिल्हा प्रशासनावर निर्णय सोडून देतात. हे आजच्या निर्णयावरुन दिसून आले. अशा निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो”, असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला.

“शासनाला आमची विनंती आहे की, शाळा सुरु करायच्या की नाही हा निर्णय लवकर घ्या. नाही करायच्या असतील तर तसे स्पष्ट सांगा, करायच्या असतील तर केव्हा करणार, याचे वेळापत्रक जाहीर करा, वेळापत्रक जाहीर करताना जर तरची भाषा वापरायची नाही”, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“देश पातळीवर राजकीय नेतृत्व नाही, हे कोरोना संकंट काळात दिसून आलं आहे. तीच गत महाराष्ट्राची झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर निर्णय ढकलून मोकळे होतात”, अशीदेखील टीका त्यांनी केली.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांकडून शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास परवानगी, शिक्षण विभागाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

गुडन्यूज! राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ, मुंबई, पुण्यासह कुठे किती कोरोनामुक्त?

चिंचपोकळीच्या चिंतामणीची 100 वर्षांची परंपरा खंडित, आगमन सोहळा रद्द, मूर्तीबाबतही महत्त्वाचा निर्णय

राम शिंदेंना धक्का, जामखेडमध्ये नगराध्यक्षांसह 10 नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत

सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र.
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान.
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO.
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?.