AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडे निर्दोष वाटायला काल रात्री अशी कोणती सत्त्व परीक्षा झाली?; प्रकाश महाजन यांचा नामदेव शास्त्रींना सवाल

धनंजय मुंडे पुरुष असतील म्हणून त्यांच्याबद्दल शास्त्रींना स्नेह असेल. न्यायाचार्य म्हटल्यानंतर न्याय देताना स्त्री-पुरुष हा भेदाभेद केला नाही पाहिजे. त्यांच्या या भूमिकेचं आश्चर्य वाटलं आणि उद्विग्नता आली. कारण ते आता राजकारणात आले. त्यामुळे टीकाटिप्पणी होणार. आता त्यांना ते सहन करावा लागणार, असं सांगतानाच कोणी कुणाला सर्टिफिकेट द्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असं मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले.

धनंजय मुंडे निर्दोष वाटायला काल रात्री अशी कोणती सत्त्व परीक्षा झाली?; प्रकाश महाजन यांचा नामदेव शास्त्रींना सवाल
dhananjay mundeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 7:21 PM

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीनचिट दिली आहे. धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही. त्यामुळे भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठी असल्याचं महंत शास्त्री यांनी म्हटलं आहे. महंतांनी पाठराखण केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी आभारही मानले आहेत. मात्र, महंत नामदेव शास्त्री यांच्या या भूमिकेचा मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी समाचार घेतला आहे. पंकजा मुंडे यांना भगवान गडाचे दरवाजे बंद करण्यात आले होते. राजकारण नको म्हणून त्यांना दरवाजे बंद होते. मग धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्याचे कारण काय? पंकजा स्त्री होती म्हणून त्यांच्यासाठी दरवाजे बंद होते का? असा सवाल करतानाच न्यायाचार्यांनी स्त्री-पुरुष भेदाभेद करून निवाडा दिला का? असा सवाल प्रकाश महाजन यांनी केला आहे.

प्रकाश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. पंकजा मुंडेंना 2015 साली गडाचे दरवाजे बंद केले. मग आज असं काय घडलं की गडाचे दरवाजे उघडले? पंकज एक स्त्री होती, अबला होती म्हणून दरवाजे बंद होते का? म्हणजे न्यायाचार्यांनी स्त्री आणि पुरुष असा भेदभाव करून निवाडा दिला का?, असा सवाल करतानाच शास्त्रीजी राजकारणात आले याचा आनंद आहे. मात्र वाईट वाटले की भावाला एक न्याय बहिणीला एक न्याय दिला गेला, असा सवाल प्रकाश महाजन यांनी केला आहे.

अशी कोणती सत्त्व परीक्षा झाली

काल रात्री अशी कोणती सत्त्वपरीक्षा झाली की त्यांना धनंजय मुंडे निर्दोष वाटतात. धनंजय मुंडे जर निर्दोष असतील तर ते न्यायालय ठरवेल. पण जो वाल्मिक निर्माण झाला त्याची जबाबदारी कोण घेणार?, असा सवालही प्रकाश महाजन यांनी केला. धनंजय मुंडे यांच्यावर मीडिया ट्रायल होतंय. परंतु एखाद्याला असं ह्युमिलिएट करू नये, असं आवाहन त्यांनी केलं.

अप्रत्यक्ष का होईना राजकारणात आले

नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेना पाठिंबा दिला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आता न्यायाचार्य नामदेव शास्त्री अप्रत्यक्षरित्या का होईना राजकारणात आले. 2015 सालापासून भगवानगडावर राजकारण करायचं नाही असं म्हणत गोपीनाथ मुंडेंपासून चालत आलेला दसरा मेळावा शास्त्रीबुवांनी बंद केला. पंकजाला दसरा मेळाव्यासाठी गडाचे दार बंद केले. मग आज कोणतं कारण घडलं की गडाचे दरवाजे राजकारणासाठी उघडे केले गेले? असा सवाल त्यांनी केला.

बाबांचा आशीर्वाद कुणाच्या मागे…

जरी गडाने पंकजा यांना दरवाजे बंद केले तरी लक्षावधी भगवान बाबांच्या भक्तांनी त्यांना तळहातावर जपून घेतले. म्हणजे भगवान बाबांचा आशीर्वाद कोणाच्या बाजूने होता हे सांगावं लागत नाही. शास्त्रीजी राजकारणात आले याचा आनंद आहे. मात्र वाईट वाटले की भावाला एक न्याय बहिणीला एक न्याय दिला. यामागचे तर्क माझ्यासारख्या सामान्य माणसाला कळले नाही. त्यांनी उघड करून सांगितले तर बरे होईल, असंही ते म्हणाले.

राजकारणाचं चारित्र्य सुधारेल

ज्या अर्थी त्यांनी राजकारणात काही अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष गोष्टी म्हणून दाखवल्या, त्याचा अर्थ ते राजकारणात आल्यासारखं झाले. एखादा साधूसंत राजकारणात येत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यामुळे राजकारणाचं चारित्र्य आणखी सुधारेल. चांगले लोक राजकारणात येणे गरजेचे आहे. नाहीतर वाईट लोक राजकारणात आल्यावर काय होतं ते आपण पाहतोय, असंही त्यांनी सांगितलं.

तुम्ही तिला नकार दिला

आज परळी, अंबाजोगाई या ठिकाणचे सर्वसामान्य लोक भयभीत आहेत. याची जबाबदारी कोण घेणार? राजकारणातील गुन्हेगारीचा ज्यांनी सतत विरोध केला, ज्यांनी गुन्हेगारी संपवली त्या गोपीनाथ मुंडे यांच्या ठिकाणी ते घडावं याचे वाईट वाटते. पंकजा मुंडे असे आरोप घेऊन आली नव्हती ना. परंपरेने आलेला दसरा मेळावा घेण्यासाठी ती आली होती. मात्र तिला तुम्ही नकार देता. कारण ती स्त्री होती. आणि यामुळेच माझ्या सारख्या भगवान बाबांना मानणाऱ्याला दु:खं होतं, असं ते म्हणाले.

मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त म्हणून.. ; राऊतांचा विरोधकांना टोला
मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त म्हणून.. ; राऊतांचा विरोधकांना टोला.
भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीला मुदतवाढ दिली
भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीला मुदतवाढ दिली.
उपकाराची जाणीव मोदींनी किती ठेवली?, राऊतांचे खळबळजनक दावे, गौप्यस्फोट
उपकाराची जाणीव मोदींनी किती ठेवली?, राऊतांचे खळबळजनक दावे, गौप्यस्फोट.
‘नरकातला स्वर्ग’ मधून राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
‘नरकातला स्वर्ग’ मधून राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.