ओबीसी नेत्यानंतर आदिवासींनाही भाजपमध्ये त्रास, 37 आमदारांना गप्प बसण्याचा सल्ला : प्रकाश शेंडगे

आदिवासी नेत्यांनाही भाजपमध्ये त्रास होत आहे." असे खळबळजनक वक्तव्य धनगर समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे यांनी (prakash shendage criticizes bjp)  केले.

ओबीसी नेत्यानंतर आदिवासींनाही भाजपमध्ये त्रास, 37 आमदारांना गप्प बसण्याचा सल्ला : प्रकाश शेंडगे
Follow us
| Updated on: Dec 09, 2019 | 5:43 PM

मुंबई : “भाजपमध्ये 37 आमदारांना कोणतेही अधिकार नाहीत. त्यांना गप्प बसण्याचा सल्ला दिला गेला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यानंतर ओबीसी नेत्यांचा त्रास वाढला. तसेच आदिवासी नेत्यांनाही भाजपमध्ये त्रास होत आहे.” असे खळबळजनक वक्तव्य धनगर समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे यांनी (prakash shendage criticizes bjp)  केले.

“माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्यानंतर ओबीसी नेत्यांचा त्रास वाढला. एकनाथ खडसेंना तिकीट न देता पाडलं.  पंकजा मुंडेंना तिकीट देऊन पाडलं, तर अनिल गोटेंचा साधा पोस्टरही भाजप लावत नाही. त्यांचीही तिकीट कापलं. तर दुसरीकडे गणेश हाकेंचे हाल केले. त्यांचे तिकीट कापले. तसेच अनेक ठिकाणी आयात करुन उमेदवार दिले. बाळासाहेब सानप यांचीही मुस्कटदाबी केली. याबाबत बावनकुळेंना सगळं माहीत आहे.”  असेही शेंडगे यावेळी (prakash shendage criticizes bjp)  म्हणाले.

“मी स्वत: भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत होतो.  त्यांना भाजपने जो त्रास दिलाय तो देशाने पाहिला आहे. तरीही भाजपच्या चोराच्या उलट्या बोंबा असेही शेंडगे यावेळी म्हणाले.

“भाजपमध्ये 37 आमदारांना कोणतेही अधिकार नाहीत. त्यांना गप्प बसण्याचा सल्ला दिला गेला आहे. तसेच आदिवासी नेत्यांनाही भाजपमध्ये त्रास होत आहे. या विरोधात आम्ही आवाज उचलला तर चंद्रकांत पाटलांची भाषा बदलली, ओबीसी नेत्यांनी काय काय सहन करायचं. दिल्लीत चर्चा आणि गल्लीत गोंधळ,” असा टोलाही शेडगे यांनी यावेळी (prakash shendage criticizes bjp)  लगावला.

“या प्रकरणी आम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो आम्ही 12 तारखेला एकत्र बसून घेऊ. त्यामुळे येत्या 12 तारखेला आम्ही मोठा निर्णय घेणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नक्की 12 डिसेंबरला भाजपमधील नाराज नेते नक्की काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे या ओबीसी असल्यामुळेच त्यांचं पक्षात खच्चीकरण केलं जात आहे, असा घणाघाती आरोप यापूर्वी शेंडगे यांनी केला होता. पंकजा मुंडे यांनी हीच ती वेळ साधून, भाजपला सोडचिठ्ठी द्यावी आणि आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा, असा सल्ला मी देईन, असेही ते म्हणाले (prakash shendage criticizes bjp)  होते.

संबंधित बातम्या : 

…म्हणून पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा : प्रकाश शेंडगे

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.