ऑपरेशन कमळबाबत इतक्यात सांगता येणार नाही, पण पक्ष सांगेल ते आम्ही नक्की करु : प्रसाद लाड

बिहारमधील विजयानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्की होणार, असा दावा भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणेयांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना केला होता.

ऑपरेशन कमळबाबत इतक्यात सांगता येणार नाही, पण पक्ष सांगेल ते आम्ही नक्की करु : प्रसाद लाड
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 3:47 PM

मुंबई : नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवलं. भारतीय जनता पक्ष अनपेक्षितपणे राज्यातील दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला. बिहारमधील विजयानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ (Operation Lotus) नक्की होणार, असा दावा भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना केला होता. तसेच राज्य सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. याबाबत आज भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) म्हणाले की, “ऑपरेशन कमळबाबत इतक्यात काही सांगता येणार नाही, पण पक्ष सांगेल ते आम्ही नक्की करु”. (Prasad Lad says Nothing can be said about Operation Lotus, We will follow Party oders)

प्रसाद लाड म्हणाले की, “शिवसेनेच्या मनात सरकार पडेल अशी भीती आहे. त्यांचं सरकार त्यांना लखलाभ. तसेच नारायण राणे यांनी ऑपरेशन कमळबाबत जी भूमिका मांडली आहे, त्याबद्दल मला कल्पना नाही. परंतु पक्ष सांगेल ते आम्ही नक्की करु. हे सरकार पाडण्याची इच्छा भाजपच्या कोणत्याही नेत्यामध्ये नाही. सत्तेतील तिन्ही पक्षांमध्ये आपसातील भांडणांमुळे उपद्रव होईल”.

“हे सरकार नोकरबदल्यांचं राजकारण करत आहे”, असा आरोप प्रसाद लाड यांनी यावेळी केला. लाड म्हणाले की, “यावर्षी होणाऱ्या अनेक बदल्या अद्याप झालेल्या नाहीत. महाविकास आघाडी सरकारने प्रशासकीय अधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. अधिकाऱ्यांच्या डोक्यावर सध्या टांगती तलवार आहे”.

दरम्यान, तब्बल आठ महिन्यानंतर पाडव्याच्या मुहूर्तावर आज राज्यातील मंदिरे उघडण्यात आली. भाजप, वंचित बहुजन आघाडीसह विविध पक्ष, संघटना, धार्मिक संघटनांच्या आंदोलनानंतर राज्यातील धार्मिकस्थळे अखेर उघडण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने आज राज्यातील सर्व प्रमुख मंदिरांजवळ जाऊन प्रचंड जल्लोष केला. याबाबत बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, “मंदिरं सुरु करा, अशी आमची मागणी होती, आम्ही त्यासाठी आंदोलनं केली, मोर्चादेखील काढला. अखेर आज सरकारने मंदिरं सुरु केली आहेत. हे या सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. हा चांगला निर्णय आहे, परंतु त्यास उशीर झाला. राज्यातील सर्वसामान्य जनता देवाचं दर्शन करेल, त्यांना आत्मशांती लाभेल”.

…आता महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्कीच होणार: नारायण राणे

बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ नक्की होणार, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. मात्र, तुर्तास याविषयी अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला. लवकरच मी याबद्दल प्रसारमाध्यमांशी सविस्तर बोलेने, असे नारायण राणे यांनी सांगितले, त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच नारायण राणे यांच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे, याविषयीदेखील चर्चा सुरु आहेत.

राज्यात पुन्हा निवडणूक घेतल्यास भाजप निवडून येईल : चंद्रकांत पाटील

आम्ही चार वर्षे विरोधात बसण्याची तयारी केली आहे, मात्र हे सरकार काही चार वर्षे चालणार नाही, म्हणजे काय तर ते गुलदस्त्यात आहे, त्यावर भाष्य करायला मी भविष्यकार नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

बिहार निवडणुकीचा परिणाम आता यापुढच्या सर्व निवडणुकांवर होणार आहे. आताही 18 राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे या निकालाचा परिणाम पश्चिम बंगालच नाही, तर यापुढच्या सर्व निवडणुकांवर होणार आहे. तुम्ही कामगार, विद्यार्थी, शेतकरी, महिला अशा 1 हजार जणांचा सर्व्हे करा, त्यातले 900 जण भाजपला मतदान करतो, असे सांगतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

संबंधित बातम्या

सरकार 2 महिन्यात जाणार, 4 महिन्यात जाणार, हे मी मंत्री झाल्यापासून ऐकतोय : मंत्री दत्ता भरणे

“विरोधकांनी मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत राहावं, कोरोना संपला की कामाची गती दाखवणार”

…म्हणून महाराष्ट्रात परत एकदा फडणवीस सरकार पाहिजे, नितेश राणे ठाकरे सरकारवर कडाडले

(Prasad Lad says Nothing can be said about Operation Lotus, We will follow Party oders)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.