Prashant Bamb : गावात न राहता 90 टक्के शिक्षकांची घरभाडे वसुली; प्रशांत बंब यांचा मोठा गौप्यस्फोट
प्रत्येक गावात जाऊन शिक्षकांची घरे पाहिली. तिथे शिक्षक राहत नव्हते. 90 टक्के शिक्षक त्याच गावात राहत नव्हते. शिक्षक हे धादांत खोटे बोलत आहेत. चुकीची कागदपत्रे सादर करून घरभाडे घेत आहेत, असा आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब (prashant bamb) यांनी केला आहे.
कन्नड: शिक्षकांमध्ये (teacher) एक वेगळ्या प्रकारचं वादंग आहे. कुणाचे काही गैरसमज झाल्याचंही वाटतं. राज्यातील 70 टक्के शिक्षक आपल्या मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता ढासळत आहे. अनेक कारणांपैकी हेही एक कारण आहे. मुख्यालयी राहण्याचं आम्हाला बंधन नाही, असं शिक्षकांचं म्हणणं आहे. त्यांना कुठेही राहून घर भाडं भत्ता मिळत आहे. मी औरंगाबादला (aurangabad) गेलो. तेव्हा कार्यकारी अधिकारी यांनी बीआरसी कमिटीला सांगितलं की, 100 टक्के शिक्षक हे मुख्यालयी राहतात. त्यानंतर मी माझी 40-40 मुलं जिल्ह्यात पाठवली. प्रत्येक गावात जाऊन शिक्षकांची घरे पाहिली. तिथे शिक्षक राहत नव्हते. 90 टक्के शिक्षक त्याच गावात राहत नव्हते. शिक्षक हे धादांत खोटे बोलत आहेत. चुकीची कागदपत्रे सादर करून घरभाडे घेत आहेत, असा आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब (prashant bamb) यांनी केला आहे. बंब यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे.