Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीच्या आत्महत्येनंतर पुन्हा दुःखाचा डोंगर, जिवलगाच्या निधनाने प्रशांत गडाख भावनावश

मला तुझ्याशी कधी तरी मित्रासारख्या गप्पा माराव्याश्या वाटायच्या, पण तू मर्यादेतच राहिला माझा पाठीराखा म्हणून, असंही प्रशांत गडाख यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय (Prashant Gadakh friend Death)

पत्नीच्या आत्महत्येनंतर पुन्हा दुःखाचा डोंगर, जिवलगाच्या निधनाने प्रशांत गडाख भावनावश
प्रशांत गडाख यांचे मित्र संदीप शानदार
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 11:26 AM

मुंबई : पत्नी गौरी गडाख (Gauri Gadakh) यांच्या आत्महत्येच्या दुःखातून सावरत असतानाच विश्वास यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख (Prashant Gadakh) यांना आणखी एक धक्का बसला. गडाख यांचा जीवलग मित्र संदीप शानदार यांनी अकाली एक्झिट घेतली. मित्र गेल्याच्या दुःखात प्रशांत गडाख यांनी फेसबुकवर भावूक पोस्ट लिहिली आहे. (Prashant Gadakh Facebook post after friend Sandeep Shandar sudden Death)

काय आहे फेसबुक पोस्ट?

संदीप शानदार गेलास तू…

संदीप नियती तुला आमच्यापासून कायमचचं घेऊन गेली. तुझं आयुष्य तेवढंच होतं. खरंतर तुझ्या मागे कोणीच नाही. म्हणजे ना आई वडील, ना बायको, ना मुलं, तू एकटाच. पण तू गेल्यानं हजारोंच्या डोळ्यात अश्रू आणलेत, हीच तुझी संपत्ती.

मी सोनईत येऊन सामाजिक कार्य सुरु केलं, तेव्हा तू उदय पालवेसोबत दिसायचास. माझ्या सामाजिक कार्यात तू पुढे न येता मागे राहत राबायचा. मी उदयला नेहमी म्हणायचो, “अरे संदीपचं काय ?” पण उदयने तुला मित्रासारखं, लहान भावासारखं, अगदी मुलासारखं संभाळलं.

एकदा कुठलं इलेक्शन होतं माहित नाही, पण थोडे वाद झाले आणि तुला एकाने गडाख साहेबांवर खालच्या पातळीवर टीका केलेली सहन झाली नाही आणि तुझा राग अनावर झाला आणि “आता त्याला आम्ही जाऊन झोडून काढतो” असं मला म्हणत होता. मी तुला दरडावून म्हटलं, “संदीप जरा शांत बस”, तू दहा पावलं मागे होत लगेच शांत.

मी कधीही उदयच्या कॅण्टीनवर गेलो की तू तिथे हजर राहत असत. मी तुला फक्त “काय संदीप”, असं म्हणत आणि तू “काही नाही भाऊ” बस.. एवढचं आपलं संभाषण. तू चहा आणायचा. कधी कधी मी तुला “बस ना संदीप” म्हणायचो, पण तू “नाही.. नाही..” म्हणत माझ्या मागे काही अंतरावर मी असेपर्यंत तटस्थ उभा असायचा, आज्ञाधारक भावासारखा. मला तुझ्याशी कधी तरी मित्रासारख्या गप्पा माराव्याश्या वाटायच्या, पण तू मर्यादेतच राहिला माझा पाठीराखा म्हणून.

तू आज आम्हाला रडवतोयस, पण काय शानदार गेलास, हार्ट अटॅकने एका क्षणात… न कोणाला त्रास न तुलाही त्रास… खरचं असं मरण आलं पाहिजे रे मित्रा… कॉलेजमध्ये उदयच्या कॅण्टीनच्या परिसरात एक झाड मी लावणार आहे आणि ते झाडच तुझं कुटुंब समजून आम्ही सर्व मित्र तुझ्या स्मृती जीवंत ठेवू, बाकी तू काय ठेवलंय आम्हाला करायला…

-प्रशांत गडाख

संदिप शानदार गेलास तू… संदिप नियती तुला आमच्यापासुन कायमचचं घेवुन गेली. तुझं आयुष्य तेवढंच होतं. खरंतर तुझ्या…

Posted by Prashant Gadakh on Wednesday, 17 February 2021

(Prashant Gadakh Facebook post after friend Sandeep Shandar sudden Death)

पत्नीच्या आत्महत्येनंतर भावना व्यक्त

“गौरी, ज्या कारणाने तू आत्महत्येचा निर्णय घेतला असशील, त्याला शिक्षा नक्कीच मिळेल. अगदी कुणी रक्ताचं असलं तरी” असा विश्वास यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख (Prashant Gadakh) यांनी गेल्या महिन्यात व्यक्त केला होता. प्रशांत गडाख यांची पत्नी आणि मंत्री शंकरराव गडाख यांची भावजय गौरी गडाख (Gauri Gadakh) यांनी जवळपास चार महिन्यांपूर्वी राहत्या घरी आत्महत्या केली होती. पत्नीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदा जाहीररित्या भावना मांडताना प्रशांत गडाख यांनी ‘वर्तमान जगायचंय मला’ या आपल्या पहिल्या प्रकाशित कवितेचा उल्लेख केला होता.

गौरी गडाख यांची आत्महत्या

गौरी गडाख नोव्हेंबर महिन्यात रात्री राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या होत्या. सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात त्यांनी गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. गौरी गडाखांच्या आत्महत्येने सोनई गावावर शोककळा पसरली आहे.

संबंधित बातम्या

गौरी गडाख यांची आत्महत्या गळफास घेऊनच, शवविच्छेदन अहवालावरुन स्पष्ट

गडाख कुटुंबाच्या कठीणकाळात शिवसेनेचा ‘तारणहार’ सरसावला, मिलिंद नार्वेकर सांत्वनासाठी नगरला

गौरी, ज्या कारणाने तू आत्महत्या केलीस, त्याला शिक्षा मिळेल, रक्ताचा असला तरी, प्रशांत गडाखांच्या भावनांचा स्फोट

(Prashant Gadakh Facebook post after friend Sandeep Shandar sudden Death)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.