Praveen Kalme : मला आजच कळतंय की माझ्याविरोधात FIR, मी आखाती देशात, सोमय्यांनी आरोप केलेले प्रवीण कलमे अवतरले

Pravi Kalme on Kirit Somaiya: प्रवीण कलमे देशातून पळून गेले असल्याचा आरोप केला जात होता. या आरोप कलमेंनी फेटाळून लावला आहे. मी आखाती देशात (मिडल ईस्टमध्ये) असल्याचं प्रवीण कलमे यांनी म्हटलंय.

Praveen Kalme : मला आजच कळतंय की माझ्याविरोधात FIR, मी आखाती देशात, सोमय्यांनी आरोप केलेले प्रवीण कलमे अवतरले
सोमय्यांच्या आरोपांनंतर प्रवीण कलमे चर्चेतImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 5:32 PM

मुंबई : प्रवीण कलमे (Praveen Kalme) हे नाव चर्चेत आलं आहे. किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत (Press Conference of Kirit Somaiya) प्रवीण कलमे यांचं नाव घेतल्यानंतर प्रवीण कलमे नेमके आहेत कुठे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. सरकारी कागदपत्रांची चोरी केल्याचा आरोप प्रवीण कलमेंवर सोमय्यांनी केलेला होता. या सगळ्या प्रश्नावर अनेक प्रवीण कलमे यांनी खुलासा केला आहे. प्रवीण कलमे हे पहिल्यांच समोर आले आणि त्यांनी स्वतःच किरीट सोमय्यांनी केलेले सगळे आरोप फेटाळून लावलेत. तसंच सोमय्यांच्या प्रश्नांना उत्तरंही दिलेलं आहे. इतकंच काय तर आपण कुठेही पळून गेलेलो नाही, असंही प्रवीण कलमे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. एबीपी न्यूज नेटवर्कशी बोलताना प्रवीण कलमे यांनी आपल्यावर उपस्थित करण्यात आलेल्या सगळ्याच आरोपांचं खंडन केलंय. आपल्याविरोधात एफआयआर झाल्याचंही किरीट सोमय्यां यांच्या पत्रकार परिषदेतून कळल्यानंच कलमे यांनी म्हटलंय.

एफआयआरबाबत आपल्याला कोणत्याही प्रकारचा ना फोन आला आणि ना इमेल आला, असं प्रवीण कलमेंनी म्हटलंय. मला कोणताही संपर्क याबाबत करण्यात आलेला नसल्याचंही कलमे यांनी यावेळी म्हटलंय. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रवीण कलमे यांना संपर्क साधण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

कुठे आले कलमे?

प्रवीण कलमे देशातून पळून गेले असल्याचा आरोप केला जात होता. या आरोप कलमेंनी फेटाळून लावला आहे. मी आखाती देशात (मिडल ईस्टमध्ये) असल्याचं प्रवीण कलमे यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे प्रवीण कलमेंनी नेमका हा सगळा प्रकार आणि प्रकरण काय आहे, त्यात त्यांचं नाव कुठून आलं, हा प्रश्नही कलमेंनी खोडून काढलाय. प्रवीण कलमे यांनी त्यांचे वकील लंडनमध्ये असल्याचं म्हटलंय. ते स्वतः मात्र एनजीओच्या कामासाठी आखाती देशात असल्याचं म्हटलंय.

एफआयआरचं गौडबंगाल..

दरम्यान, सोमय्यांनी केलेल्या आरोपानंतर आता आम्हीही कायदेशीर लढा देण्यासाठी तयार आहोत, असंही कलमे यांनी म्हटलं आहे. माझ्याविरोधात दाखल कऱण्यात आलेला एफआयआर खरा आहे की खोटा आहे, याबाबतही पडताळणी आणि चौकशी व्हायला हवी, अशी मागणी प्रवीण कलमे यांनी यावेळी बोलताना केली आहे.

पाहा व्हिडीओ : सोमय्यांनी केलेला आरोप नेमके काय?

ठाकरे कुटुंबीय मनी लॉन्ड्रिंगसाठी चतुर्वेदीचा वापर करतायत का?, किरीट सोमय्यांचा सवाल

Kirit Somaiya यांचा हा दिलासा घोटाळाच आहे- Sanjay Raut यांचा न्यायव्यवस्थेवर गंभीर आरोप

 भ्रष्टाचाराविरूध्द कोणी बोलायचे ? सामनातून भाजपशासीत राज्यातील भ्रष्टाचारावर भाष्य

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.