Bihar Election Result Live Update: बिहार निवडणुकीच्या निकालांवरुन प्रवीण दरेकर-अमोल मिटकरी आमने-सामने

बिहार निवडणुकीच्या निकालांवरुन प्रवीण दरेकर आणि अमोल मिटकरी यांच्यात आरोप- प्रत्यारोप  झाले. (Pravin Darekar Amol Mitkari criticize each other on Bihar Election)

Bihar Election Result Live Update: बिहार निवडणुकीच्या निकालांवरुन प्रवीण दरेकर-अमोल मिटकरी आमने-सामने
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 10:12 AM

मुंबई : बिहार निवडणुकीच्या निकालावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. नितीशकुमार यांच्याबद्दलच्या अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसतोय. तेजस्वी यादव यांनी बिहारचा फार विकास केलेला नाही, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. बिहारमध्ये जर एनडीए सत्तेत आले तर नितीशकुमार मुख्यमंत्री होणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विचारला. बिहार निवडणुकीच्या निकालांवरुन प्रवीण दरेकर आणि अमोल मिटकरी यांच्यात आरोप- प्रत्यारोप  झाले. (Pravin Darekar Amol Mitkari criticize each other on Bihar Election)

शंभर टक्के आकडे बदलतील, वाट पाहायला पाहिजे. काँग्रेसचे आकडे वाढत नाहीत. त्यामुळे अजून वाट पाहायला पाहिजे. अंतिम निकाल येईपर्यंत वाट पाहावी लागेल. नितीशकुमार यांच्याबद्दलच्या अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसतोय. तेजस्वी यादव यांनी बिहारचा फार विकास केलेला नाही, असं महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रवीण दरेकर यांना बिहार निवडणुकीवरुन प्रश्न विचारले आहेत. बिहारमध्ये जर एनडीए सत्तेत आले तर नितीशकुमार मुख्यमंत्री होणार का? असा सवाल मिटकरी यांनी विचारला. प्रवीण दरेकर यांनी नितीश कुमार हेच भाजप आणि जदयू आघाडीचे मुख्यमंत्री असतील, असा ठाम विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.

अमोल मिटकरी अभ्यासू आणि तरुण नेतृत्व आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊ असं आश्वासन दिलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणूक लढलो. बिहारमध्ये मोठा भाऊ भाजप ठरलं तरी देखील मुख्यमंत्री नितीशकुमार हे मुख्यमंत्री होतील, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

बिहार निवडणुकीतील सुरुवातीच्या कलांवरुन भाजप आत्मचिंतन करणार का? असा सवाल अमोल मिटकरी यांनी विचारला. यावर प्रवीण दरेकर यांनी आमच्या पक्षाला आत्मचिंतनाची पंरपरा असल्याचे सांगतिले.

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या पहिल्या कलांमध्ये महाआघाडीनं जोरदार मुसंडी मारली आहे. राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात महाआघाडीने 121 जागांवर आघाडी मिळवली आहे. एनडीए 113 जागांवर आघाडीवर आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये राजदनं 78, काँग्रेस 22, इतर 13 आणि एनडीएकडून भाजप 64 आणि जेडीयू 50 जागांवर आघाडीवर आहे.

संबंधित बातम्या :

Bihar Election Result 2020 : पहिल्या तासाभरातच तेजस्वी यादवांचा करिष्मा, RJD ची मुसंडी

Bihar Election Result 2020 LIVE | महागठबंधन आणि एनडीए यांची कट-टू-कट लढाई

(Pravin Darekar Amol Mitkari criticize each other on Bihar Election)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.