आम्ही धमक्यांना भीक घालत नाही, आमचे कार्यकर्ते संघाच्या मुशीत तयार झालेत, प्रविण दरेकरांचा इशारा
आम्ही अशा धमक्यांना भीक घालत नाही, आमचे कार्यकर्ते संघाच्या मुशीत तयार झालेले आहेत, असा इशारा प्रविण दरेकरांनी दिला. Pravin Darekar threat calls to BJP leaders
मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकार दडपशाहीचं काम करत असल्याचा आरोप केला. चित्रा वाघ आणि अतूल भातखळकर यांना धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही अशा धमक्यांना भीक घालत नाही, आमचे कार्यकर्ते संघाच्या मुशीत तयार झालेले आहेत, असा इशारा प्रविण दरेकरांनी दिला. भाजप नेत्या चित्रा वाघ यांना धमकीचे फोन आल्याची माहिती त्यानी स्वत: ट्विटरवर दिली होती. आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्यालाही धमकीचे फोन आल्याची तक्रार केली आहे. (Pravin Darekar comment on threat calls to BJP leaders)
आमचे कार्यकर्ते संघाच्या मुशीत तयार झाले
भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अतुल भातखळकर यांना धमक्या दिल्या जात आहेत. मात्र, आम्ही त्या धमक्यांना भीक घालत नाही, अशी आक्रमक भूमिका प्रवणि दरेकरांनी घेतली. आमचे कार्यकर्ते संघाच्या मुशीत तयार झालेत, असंही ते म्हणाले.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण
बीड जिल्ह्यातील तरुणी पूजा चव्हाण हिनं पुण्यात आत्महत्या केलीय. या प्रकरणी ज्यांच्याकडे संशयाची सुई दाखवली जातीय त्यांनी स्टेटमेंट द्यायला हवं. आमच्यामधेय वैयक्तिक वाद नाही. मात्र, ऐन करियरचा ऊमेदीच्या काळात एका मुलीनं आत्महत्या केली, हे चुकीचं, तिच्या आत्महत्येचा छडा लावणं गरजेचं, असं प्रवीण दरेकर म्हणाले. पूजा चव्हाणवर कर्जाचा ताणतणाव होता. पण, कर्जाच्या तणावामुळे आतामहत्या केली हे कुठे सांगितलं..? वर्षभरात जे गुन्हे घडले त्याची यादी आहे, सरकारने गृहखात्याला वेठीस धरलं, जगभरात पोलीस विभागाची प्रतिमा मलिन केली गेली, असा आरोप देखील प्रविण दरेकरांनी केला.
चित्रा वाघ आणि अतुल भातखळकरांची धमकीवर प्रतिक्रिया
‘अशा धमक्यांना भीक घालत नाही’
पूजा चव्हाण प्रकरणात चित्रा वाघ यांनी वनमंत्री संजय राठोड यांचं थेट नाव घेत गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर त्यांना धमकीचा फोन आल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच “धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही. त्यामुळे उगाच मला फोनकरून वेळ वाया घालवू नका माझ्या भावड्यांनो”, असं प्रत्युत्तरही चित्रा वाघ यांनी ट्विटरवर दिलं आहे.
चित्रा वाघ यांच्यानंतर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनाही धमकीचे फोन आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. “पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे काल पासून धमक्यांचे फोन येतायत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे. धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे”, असा इशाराच भातखळकर यांनी ट्विटरवरुन दिलाय.
‘देखते है’ म्हटलं की काय होतं याचा बोध घ्या, उदय सामंतांची भाजपला कोपरखळीhttps://t.co/KyEFTJOpd0#udaysamant | #bjp | #Shivsena | #chandrakantpatil | @BJP4Maharashtra | @ShivSena | @samant_uday
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 15, 2021
संबंधित बातम्या:
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप, चित्रा वाघांना धमकीचे फोन
पूजा चव्हाणबद्दल आवाज उचलल्याने मलाही कॉल करा, बघू शिवसेनेत कोण मर्द उरलाय : नितेश राणे
(Pravin Darekar comment on threat calls to BJP leaders)