AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाविकास आघाडीबाबत मुख्यमंत्र्यांच्या मनात शंका’, ‘शिवसंपर्क’ अभियानावरुन प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानाची घोषणाही केलीय. शिवसैनिकांनी युती किंवा आघाडीची चिंता करु नये. तुम्ही कामाला लागा, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपल्या शिवसैनिकांना दिलाय. हाच धागा पकडत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावलाय.

'महाविकास आघाडीबाबत मुख्यमंत्र्यांच्या मनात शंका', 'शिवसंपर्क' अभियानावरुन प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंना टोला
प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 10:46 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ऑनलाईन माध्यमांद्वारे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसंपर्क अभियानाची घोषणाही केलीय. शिवसैनिकांनी युती किंवा आघाडीची चिंता करु नये. तुम्ही कामाला लागा, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी आपल्या शिवसैनिकांना दिलाय. हाच धागा पकडत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावलाय. उध्दव ठाकरे यांनी आज शिवसैनिकांना दिलेला संदेश म्हणजे आगामी काळात महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाईल की नाही याचीच शंका त्यांना बहुधा आली असावी, अशी टीका दरेकरांनी केलीय. (Pravin Darekar criticizes CM Uddhav Thackeray and Shivsena over Shiv samparka Abhiyan)

शिवसेना पक्षप्रमुखांचा आजचा संदेश म्हणजे अलीकडच्या काळातील तिन्ही पक्षांच्या सरकारमधील विसंवाद असल्याचे स्पष्ट दिसत आहे. युती आणि आघाडीबद्दल वेगवेगळी राजकीय समीकरणं सांगितली जात आहे. त्यामुळे शिवसैनिकांना प्रेरणा आणि चेतना देण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करण्याशिवाय शिवसेना पक्षप्रमुखांना पर्याय नाही, असंही दरेकर म्हणाले. शिवसैनिकांनी जनतेसाठी काम करावं, विकासकामे करावीत, असा संदेश पक्षप्रमुखांनी दिला आहे. पण आमदारांना विकास कामासाठी शासनाकडून निधी द्यावा लागतो. मात्र, दुर्दैवाने अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे आज शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक नाराज आहेत. त्यांना योग्य विकास निधी दिला जातं नाही. त्यामुळे विकास कामे ठप्प आहेत, असंही दरेकर म्हणाले.

युती की आघाडी? निर्णय मुख्यमंत्रीचं घेऊ शकतात

युती की आघाडी करायची हा निर्णय मुख्यमंत्रीचं घेऊ शकतात. मुख्यमंत्री युतीही करू शकतात अणि आघाडीसुद्धा करू शकतात, त्यामुळे या दोघांपैकीचं एक निर्णय होऊ शकतो. किंवा तिसरा निर्णय निवडणुकीला सामोरे जायचा होऊ शकतो. महाविकास आघाडी सरकारमध्ये काय होईल, युतीचं काय होईल, उद्या अचानक निवडणुका लागल्यास त्यांना सामोरे कसं जायचं? त्यामुळे उद्याच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत शिवसैनिकांना ताकदीनं उभं करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आज हा संदेश दिला असावा, असा टोलाही दरेकर यांनी लगावलाय.

शिवसेनेचं ‘शिवसंपर्क’ अभियान

मुख्यमंत्र्यांकडून ‘शिवसंपर्क’ मोहीमेची घोषणा करण्यात आली. येत्या सोमवारपासून म्हणजे 12 जुलैपासून राज्यभर ही मोहीम राबवली जाणार आहे. तसेच शाखाप्रमुखांना प्रत्येक घराघरात जाऊन लोकांनी लस घेतली की नाही याची माहिती घेण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात पंचायत समिती, जिल्हा परिष, नगर परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात होऊ घातल्या आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची संवाद यात्रा सुरू असतानाच आता शिवसेनेनेही शिवसंपर्क मोहीम सुरू केली आहे. दुसरीकडे काँग्रेसन आणि भाजपनेही जनमत आपल्याकडे वळवण्यासाठी आंदोलनांचा आधार घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या शिवसंपर्क मोहिमेला अधिक महत्त्व आलं आहे.

12 ते 24 जुलैपर्यंत शिवसंपर्क मोहीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी येत्या 12 ते 24 जुलैपर्यंत शिवसंपर्क मोहीम हाती घेण्याच्या सूचना दिल्या. या मोहिमेअंतर्गत “माझं गाव, करोना मुक्त गाव” करण्यासाठी शाखाप्रमुखांनी प्रत्येक घराघरात जाऊन लसीकरण झालं की नाही याची माहिती घ्यावी. इतर काही अडचणी आहेत का? विकासात्मक योजना त्यांच्या पर्यंत पोहचत आहेत की नाही, याचीही माहीती घ्या, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सांगितलं जातं.

संबंधित बातम्या :

शिवसेनेची सोमवारपासून ‘शिवसंपर्क मोहीम’, आघाडी-युतीची चिंता करू नका; मुख्यमंत्र्यांनी शाखाप्रमुखांना दिले ‘हे’ आदेश

‘शिवसेनाप्रमुखांना राणेंची उंची माहीत होती, म्हणूनच मुख्यमंत्रीपदी बसवलं’, प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांना टोला

Pravin Darekar criticizes CM Uddhav Thackeray and Shivsena over Shiv samparka Abhiyan

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.