“राऊतांनी फुकटचा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला असता तर अर्थव्यवस्थेला गती देता आली असती” प्रविण दरेकरांचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी वीस लाख कोटींच पॅकेज दिलं. मला वाटतं संजय राऊत यांनी अशा प्रकारचा फुकटचा सल्ला उद्धव ठाकरे यांना द्यावा, असं प्रविण दरेकर म्हणाले. (pravin darekar sanjay raut economy corona virus)

राऊतांनी फुकटचा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला असता तर अर्थव्यवस्थेला गती देता आली असती प्रविण दरेकरांचा टोला
प्रविण दरेकर आणि संजय राऊत
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 5:20 PM

मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी वीस लाख कोटींच पॅकेज दिलं. मला वाटतं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अशा प्रकारचा फुकटचा सल्ला उद्धव ठाकरे यांना द्यावा. त्यामुळे महाराष्ट्राला गटांगळ्याच काय त्यापेक्षा दुर्दैवी असणाऱ्या अर्थव्यस्थेला नीट गती देता येईल,” अशी खोचक टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी त्यांच्या सामनामधील रोखठोक या सदरामध्ये आज (25 एप्रिल) केले होते. त्याला उत्तर म्हणून दरेकर यांनी वरील भाष्य केले. (Pravin Darekar criticizes Sanjay Raut on Maharashtra India Economy and Corona virus)

मनमोहन सिंगापेक्षा दीड पटींनी अर्थव्यवस्थेचा विकास

प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांनी सामनामध्ये लिहलेल्या रोखठोक या सदरातील मजकुरावर चांगलीच टीका केली आहे. दरेकर यांनी मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे स्थिर ठेवण्याचं काम केलं. तसेच लोकांसाठी 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं असं सांगितलं. “अर्थव्यवस्थेच्या ज्ञानाची संजय राऊत यांनी उजळणी करण्याची आवश्यकता आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मागील दहा वर्षात जी प्रगती करु शकले नाहीत, ती प्रगती मोदींनी दीडपट गतीने गेल्या पाच वर्षांमध्ये केली. मोदींनी देश अर्थव्यवस्थेत प्रगतीकडे नेला याचं भान संजय राऊतांना नाही. किंवा ते समजून न उमजल्यासारखं करत आहेत,” असं प्रविण दरेकर म्हणाले.

हा फुकचा सल्ला उद्धव ठाकरेंना द्यावा

पुढे बोलताना दरेकर यांनी राऊत यांनी अर्थव्यवस्थेविषयीचे सल्ले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी द्यावेत असा खोचक टोला लगावला. तसेच मोदी यांनी देशाचा विकासदर जास्त ढासळू दिला नाही, असासुद्धा त्यांनी केला. “कोरोनाच्या काळात जगाची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना मोदी यांनी देशाचा विकासदर फक्त वजा 8% पर्यंत ठेवला. तसेच मोदींनी अर्थव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी वीस लाख कोटींचं पॅकेज दिलं. मला वाटतं संजय राऊत यांनी अशा प्रकारचा फुकटचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावा. त्यामळे महाराष्ट्रातल्या गटांगळ्याच काय त्यापेक्षा दुर्दैवी असणाऱ्या अर्थव्यवस्थेला नीट गती देता येईल,” असे दरेकर म्हणले. तसेच राऊत केंद्रीय आणि देशपातळीवरचे नेते असल्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेविषयी त्यांना चिंता करावीशी वाटत नाही, असा आरोपसुद्धा दरेकर यांनी राऊतांवर केला.

संजय राऊत रोखठोकमध्ये काय म्हणाले ?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक सामनातील रोखठोक या सदरातून मोदींवर हल्ला चढवला. कोरोना महामारीने देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. आज देशातील 60 टक्के कामगार बेकार झाले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न दोन तृतीयांशने खाली आले आहे, पण आपले राज्यकर्ते मात्र उदासीन आणि आत्मसंतुष्ट आहेत, असं सांगतानाच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत. अशा संकटसमयी एखादा नवा मनमोहन सिंग निर्माण करून त्याच्या हाती देशाची अर्थव्यवस्था सोपवणे गरजेचे आहे, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं.

इतर बातम्या :

Corona Cases and Lockdown News LIVE : पिंपरी चिंचवड शहरातील तीन आमदार कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सरसावले

विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो; चंद्रकांतदादांनी बोलून दाखवली सल

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.