दोन नेते एकमेकांना भेटू शकतात, प्रवीण दरेकरांनी वाढवलं राऊत-शेलार भेटीचं गूढ
शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात चार दिवसांपूर्वीच गुप्त बैठक झाली. त्यानंतर आज संजय राऊत आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यात आज मुंबईत गुप्त भेट झाली. (sanjay raut)
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात चार दिवसांपूर्वीच गुप्त बैठक झाली. त्यानंतर आज संजय राऊत आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्यात आज मुंबईत गुप्त भेट झाली. अधिवेशनाच्या तोंडावरच या दोन्ही नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दोन नेते एकमेकांना भेटू शकतात, असं सांगून या भेटीचं गूढ वाढवलं आहे. (pravin darekar reaction on Sanjay Raut and Ashish Shelar’s secret meeting)
शिवसेना नेते संजय राऊत आणि आशिष शेलार याची नरिमन पॉईंटस येथील मेकर चेंबर्स येथे ही भेट झाली. त्यामुळे या भेटीवर तर्कवितर्क सुरू असतानाच प्रवीण दरेकर यांनी संदिग्ध प्रतिक्रिया व्यक्त करून चर्चेला हवा दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून काही भेटीगाठी सुरू आहेत. पण या भेटीत एक नेतृत्व कायम आहे. ते म्हणजे संजय राऊत. पण राऊत आणि शेलार यांनी भेटीचं खंडन केलं आहे. भेट झाली नसेल तर त्यावर तर्कवितर्क करणं चुकीचं आहे, असं सांगतानाच तुमच्याकडे फुटेज असले तरी दोन नेते एकमेकांना भेटू शकतात, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.
आम्ही विरोधातच राहणार
भाजप कुणालाही ब्लॅकमेल करत नाही. आम्ही आमचं काम करत आहोत. भाजप हा सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे, असंही दरेकर यांनी सांगितलं. तसेच शिवसेनेने हात पुढे केला तरी आम्ही विरोधातच राहणार असंही त्यांनी स्पष्ट केलं.
भेट झाली असती तर लपवण्याचं कारण नाही
काही स्पेसिफिक कारण असेल तर कोणीही नेता कुणाला भेटू शकतो. राऊत यांच्यासोबत माझी भेट झाली असती तर लपवण्याचं कारणच येत नाही, असं शेलार यांनी सांगितलं.
तासभर खलबतं
दरम्यान, मेकर्स चेंबर्स येथे संजय राऊत आणि आशिष शेलार भेटले. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. या भेटीत नेमकी कशावर चर्चा झाली याचा तपशील गुलदस्त्यात आहे. दोन्ही नेत्यांनी अशा भेटीचा इन्कार केला आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या गाड्या मेकर्स चेंबर्समधून बाहेर पडताना कॅमेऱ्यानं टिपल्या आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते काही तरी लपवत असल्याचं उघड होत आहे. (pravin darekar reaction on Sanjay Raut and Ashish Shelar’s secret meeting)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 3 July 2021 https://t.co/Be45klPCNm #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 3, 2021
संबंधित बातम्या:
मोठी बातमी : संजय राऊत आणि आशिष शेलार यांची गुप्त बैठक, महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप निश्चित?
गृहविभागाचा भन्नाट प्रस्ताव, पोलीस शिपाई सुद्धा PSI होणार!
बंडातात्या कराडकर यांची अटक म्हणजे आघाडी सरकारकडून वारकऱ्यांची मुस्कटदाबी : प्रविण दरेकर
(pravin darekar reaction on Sanjay Raut and Ashish Shelar’s secret meeting)