Presidential Election : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी सर्व विरोधकांचा एकच उमेदवार असावा, सोनिया गांधींचा पुढाकार, मल्लिकार्जुन खर्गेंनी घेतली पवारांची भेट

सोनियांची इच्छा सांगितली. सगळ्या पार्ट्यांनी, एकत्र येऊन, चर्चा करुन त्यानंतर उमेदवार निश्चित करण्यात येईल. जोपर्यंत मिटिंग होत नाही, तोपर्यंत उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात येणार नाही. बैठकीनंतरच नाव निश्चित करण्यात येईल. असे खर्गे म्हणाले आहेत.

Presidential Election : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी सर्व विरोधकांचा एकच उमेदवार असावा, सोनिया गांधींचा पुढाकार, मल्लिकार्जुन खर्गेंनी घेतली पवारांची भेट
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 9:23 PM

मुंबई : आजच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर (Presidential Election)केला आहे. त्यानुसार देशाला काही दिवसांतच नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. त्यासाठी विरोधी पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आज काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी याच निवडणुकीबाबत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून भेट घेतली आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व विरोधकांचा मिळून एकच उमेदवार असावा, यासाठी सोनियांनी सांगितले होते. शरद पवार, उद्धव ठाकरे, मतता बॅनर्जी, डीएमके, सपाच्या नेत्यांची चर्चा करण्यास सांगितले आहे. त्यांच्या सांगण्यावरुन पवारांना भेटण्यासाठी आलो होतो. सोनियांची इच्छा सांगितली. सगळ्या पार्ट्यांनी, एकत्र येऊन, चर्चा करुन त्यानंतर उमेदवार निश्चित करण्यात येईल. जोपर्यंत मिटिंग होत नाही, तोपर्यंत उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात येणार नाही. बैठकीनंतरच नाव निश्चित करण्यात येईल. असे खरगे या बैठकीनंतर म्हणाले आहेत.

एकच उमेदवार असावा यावर एकमत

राष्ट्रपदीपदासाठी विरोधकांकडून एकच उमेदवार असावा यावर एकमत झाल्याचे या बैठकीनंतर सांगण्यात आले आहे. समविचारी पक्षांना एकत्र करण्याची गरज आहे. अनेकांना विचारावे लागेल. आजचे सगळे लक्ष 10 आणि 19 या तारखांवर आहे.  बाकीचे सहकारी ठरवतील त्या दिवशी बैठकीला जाऊ, अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या खर्गेंच्या भेटीनंतर पवारांनी दिली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट

निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर

काही दिवसात नवे राष्ट्रपती

18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. तसेच 21 जुलैला या निवडणुकीचा निकाल जाहीर करत असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या निवडणुकीची तयारी देशातील विरोधी पक्षांकडूनही सुरू झाली आहे. उशीर करण्याऐवजी लवकच तयारी पूर्ण करण्यासाठीच आजची ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आता विरोधक कुणाला उमेदवारी देतात? हेही पाहणं तितकेच महत्वाचं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.