दबाव आला पण, हुकुमशाहीला शरण गेले नाहीत, संजय राऊतांच्या जामिनावर वरुण सरदेसाई म्हणाले…
नंतर त्यांचे नेते बिनधास्तपणे सांगतात. तुला जेलमध्ये टाकून देऊ.

कोल्हापूर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना १०२ दिवसांनंतर जामीन मिळाला. याबाबत बोलताना वरुण सरदेसाई म्हणाले, फक्त शिवसैनिकचं नाही, तर राज्यातील जनता जल्लोष व्यक्त करीत आहेत. ते एक सज्जे नेते, एक सज्जे शिवसैनिक आहेत. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्यावर दबाव आला. शंभर दिवस जेलमध्ये राहिले. पण, हुकुमशाहीला शरण गेले नाहीत. कोल्हापुरात वरुण सरदेसाई बोलत होते.
हा जामीन आधीच मिळायला पाहिजे होता. परंतु, गेल्या अनेक सुनावण्यांमध्ये मुद्दामहून वेळकाढूपणा सरकारच्या बाजूनं केला जात होता. शेवटी सत्त्याच्या विजय झालेला आहे. आमची मुलुखमैदानी तोफ संजय राऊत यांचा जामीन झाला आहे. राज्यभर याचा आनंद साजरा होत आहे.
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संजय राऊत यांचा जामीन झालेला आहे. जो कोणी भाजपविरोधात बोलतो. जो कोणी सरकार विरोधात बोलतो. मग चौकशी लावली जाते. नंतर त्यांचे नेते बिनधास्तपणे सांगतात. तुला जेलमध्ये टाकून देऊ.
दबावतंत्रानंतर काही लोकं भाजपमध्ये प्रवेश करतात. संजय राऊतांनी आपल्या पक्षासोबत, आपल्या नेत्यासोबत इमान राखले. राऊत जेलमधून बाहेर आल्यानंतर शिवसैनिक हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असंही वरुण सरदेसाई यांनी सांगितलं.
संजय राऊतांना बाहेर येऊ द्या. निष्ठावंत शिवसैनिक त्यांचे जल्लोषात स्वागत करतील. थोडे दिवस त्यांना आराम करू द्या. मग एकदा का ते मैदानात उतरले की, त्यांना कोणी थांबवू शकत नाही. शिवसेनेसाठी हा मोठा दिवस आहे. आता त्यांची मुलुखमैदानी तोफ पुन्हा दणाणेल, असंही वरुण सरदेसाई यांनी सांगितलं.