Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचं 100व्या वर्षात पदार्पण! आईचे पाय धुऊन मोदींनी घेतले शुभाशीर्वाद
Narendra Modi Gujrat : आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त मोदी पावागढ मंदिरात मां कालिका देवीची पूजाही करणार आहेत.
गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज आणि उद्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त खास घरू जाऊन भेट घेतली. दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्याची (Modi in Gujarat) सुरुवात करताना मोदींनी आपली आई हिराबेन यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत वेळ घालवला. आईसोबतच देवाची पूजाही केली. आईचे चरणही धुतले. आशीर्वाद घेतला. आईला खास शाल देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. यानंतर मायलेकांनी एकमेकांना मिठाई भरवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांनी वयाच्या 100 व्या वर्षात पदार्पण केलंय. त्यानिमित्त खास नरेंद्र मोदी यांनी राहत्या घरी भेट घेत आईसोबत वेळ घालवला.
पाहा व्हिडीओ
#WATCH | Gujarat: Prime Minister Narendra Modi met his mother Heeraben Modi at her residence in Gandhinagar on her birthday today.
हे सुद्धा वाचाHeeraben Modi is entering the 100th year of her life today. pic.twitter.com/7xoIsKImNN
— ANI (@ANI) June 18, 2022
आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त मोदी पावागढ मंदिरात मां कालिका देवीची पूजाही करणार आहेत. यावेळी मंदिरात मोदींच्या हस्ते ध्वजारोहणही केलं जाईल. पावागढ मंदिर डोंगरावर असून या मंदिरात जाण्यासाठी रोप-वेची मदत घ्यावी लागले. त्यानंतर 250 पायऱ्या चढल्यानंतर देवीचं दर्शन होतं. दरम्यान, मोदी थेट हेलिकॉप्टरने पावागढ मंदिरात जाण्यासाठी हॅलिपॅडवर उतरतील.
Took blessings of my mother today as she enters her 100th year… pic.twitter.com/lTEVGcyzdX
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2022
वेगवेगळ्या योजनांचा शुभारंभ
वडोदरामध्ये मोदींची एक सभाही होणार आहे. या सभेत मोदी मातृशक्ती योजना आणि पोषण सुधा योजनेचा शुभारंभ करणार आहेत. या योजनेद्वारे गर्भवती आणि लहान मुलांना स्तनपान करण्यासाठी पोषण आहार दिला जाणार आहे. मोदींच्या गुजरात दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तही वाढवण्यात आलाय.
आगामी गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींचा गुजरात दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय. 10 जूनलाही मोदी गुजरात दौऱ्यावर होते. मोदी आपल्या दौऱ्यात महाकाली माताजी मंदिरानंतर विरासत वन इथंही भेट देण्यात आहेत. त्यानंतर ते गुजरात गौरव अभियानाला संभोधित करतील. या दरम्यान ते भारतीय रेल्वेच्या 16 हजार 369 कोटी रुपयांच्या 18 योजनांचं उद्घाटनही करणार आहेत.