Lata Mangeshkar Funeral : पंतप्रधान मोदींनी शिवाजी पार्कवर वाहिली लतादीदींना श्रद्धांजली, दिग्गजांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मुंबईतील शिवाजी पार्क इथं लता मंगेशकर यांना पुष्पचक्र अर्पण करत त्यांचं अंत्यदर्शनं घेतलं. यानंतर त्यांनी मंगेशकर कुटुंबीयांशी संवादही साधला.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मुंबईतील शिवाजी पार्क इथं लता मंगेशकर यांना पुष्पचक्र अर्पण करत त्यांचं अंत्यदर्शनं घेतलं. यानंतर त्यांनी मंगेशकर कुटुंबीयांशी संवादही साधला. शिवाजी पार्कमध्ये अनेक दिग्गजांची लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना अखेरला अलविदा देण्यासाठी उपस्थिती दिली. पंतप्रधानानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, यानंतर आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासह दिग्गजांनी त्यांना आदरांजली वाहिली. लता मंगेशकर यांच्या निधनाचं वृत्त कळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. लता मंगेशकर यांचे काही फोटो शेअरकरत मोदींनी म्हटलं होतं की,… मी शब्दांत व्यक्त करु शकत नाही, की मला किती दुःख झालंय. दयाळू लतादीदी आपल्याला सोडून गेल्यात. त्यांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीच भरुन न येण्यासारखी आहे!
Prime Minister Narendra Modi pays last respect to veteran singer Lata Mangeshkar in Mumbai pic.twitter.com/2WtTe9aXgT
— ANI (@ANI) February 6, 2022
मोदींनी पुढे म्हटलं होतं की,…
लता मंगेशकर यांनी अनेक भावनांना आपल्या स्वरातून उजागर केलं होतं. अनेक दशकं सिनेमा क्षेत्रातील बदलांच्या त्या साक्षीदार होत्या. सिनेमासोबत लतादीदींनी नेहमीच भारताच्या विकासीही काळजी वाहिली होती. लता मंगेशकर यांनी एक मजबूत आणि विकसीत भारत पाहायचा होता. मला नेहमीच त्यांना स्नेह मिळाला. त्यांच्यासोबत झालेली चर्चा, संवाद हा माझ्या नेहमीच लक्षात राहील. मंगेशकर कुटुंबीयांच्या दुःखात मी सामील आहे, असंही मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
लता मंगेशकर यांची प्रा
Lata Didi’s songs brought out a variety of emotions. She closely witnessed the transitions of the Indian film world for decades. Beyond films, she was always passionate about India’s growth. She always wanted to see a strong and developed India. pic.twitter.com/N0chZbBcX6
— Narendra Modi (@narendramodi) February 6, 2022
णज्योत आज (रविवार 6 फेब्रुवारी) सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी मालवली. गेल्या 28 दिवसांपासून त्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र, शनिवारी त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. दुपारी 12.15 वाजता त्यांचे पार्थिव ब्रीच कँडितून परेड रोड येथील त्यांच्या प्रभू कुंज येथील निवासस्थानी दुपारी 3 वाजेपर्यंत ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव शिवाजी पार्कवर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आलं. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गजांची उपस्थिती पाहायला मिळाली होती.
पाहा व्हिडीओ –
संबंधित बातम्या :
शांत स्वभावाच्या लतादिदी जेव्हा मोहम्मद रफींवर भडकल्या, म्हणाल्या, “मी नाही गाणार तुमच्यासोबत”
Lata Mangeshkar : शरद पवार पंतप्रधान व्हावे, लतादिदींनी व्यक्त केलेली इच्छा-सोलापूरचे माजी महापौर