उद्धव ठाकरेंच्या घराशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा, मुंबई दौरा, अजेंडा BMC निवडणुका?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच मुंबईत येत आहेत.

उद्धव ठाकरेंच्या घराशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा, मुंबई दौरा, अजेंडा BMC निवडणुका?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 3:59 PM

मुंबईः मुंबईतील विकास कामांच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) येत्या 19 जानेवारी रोजी मुंबईत येत आहेत. हा पूर्णपणे राजकीय दौरा आहे, मुंबई महापालिका निवडणुका (BMC Election) डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आतापासूनच पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीला जुंपले आहेत. यातच आणखी एक बातमी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी मुंबईत एका मोठ्या सभेला संबोधित करणार आहेत. ही सभा उद्धव ठाकरे यांच्या घराशेजारी म्हणजेच बीकेसी ग्राउंडवर घेतली जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी अनेक विकासकामांचे उद्धाटन करतील. पण मोदी येत आहेत म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमधील अडथळे लवकरच दूर होणार आहेत, याचेही संकेत मिळत आहेत.

लवकरच मुंबई महापालिका निवडणुकांची घोषणादेखील होऊ शकते, अशी चर्चा आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच मुंबईत येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या मुंबई दौऱ्यात सेंट्रल पार्क आणि बेलापूर स्टेशनदरम्यान, नवी मुंबई मेट्रोच्या 5.96 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचं उद्घाटन केलं जाईल. या प्रसंगी मुंबई मेट्रोच्या 2 ए आणि 7 हा 35 किमी लांबीचा रेल्वेमार्ग सुरु होऊ शकतो.

एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 28,000 कोटी रुपयांचे बजेटच्या 7 एसटीपी म्हणजे सीवेज ट्रीटमेंट प्लांटचे भूमीपूजनदेखील यावेळी करतील.

मुंबईत 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटिकरण केले जाणार आहे. या प्रकल्पाचेही भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. गोरेगाव, ओशिवारा आणि भांडुप येथील तीन रुग्णालयांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री तयारीला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा जाहीर झाल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तयारीला लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमी फोरम येथील दौराही आटोपता घ्यायचा ठरवला आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा हा दौराच रद्द केला. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यानंतर राज्यातील गुंतवणूकीच्या संधी वाढणार आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.