AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाणांचं नाव विचाराधीन : शरद पवार

पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan Satara bypoll) यांच्यासोबतच माजी खासदार श्रीनिवास पाटील यांचंही नाव विचाराधीन असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.

उदयनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाणांचं नाव विचाराधीन : शरद पवार
| Edited By: | Updated on: Sep 27, 2019 | 9:27 PM
Share

पुणे : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan Satara bypoll) यांच्यासह तीन ते चार नावांची चर्चा आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan Satara bypoll) यांच्यासोबतच माजी खासदार श्रीनिवास पाटील यांचंही नाव विचाराधीन असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. उदयनराजे भोसले यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता साताऱ्यात पोटनिवडणूक होत आहे.

श्रीनिवास पाटील दोन वेळा जुन्या कराड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून श्रीनिवास पाटील यांची ओळख आहे. श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीमुळे उदयनराजेंसमोर मोठे आव्हान उभे राहू शकतं.

पृथ्वीराज चव्हाण यांनाही हायकमांडकडून निवडणूक लढवण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. कारण, पवारांनीच पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव सुचवल्याची माहिती आहे. काँग्रेस हायकमांड पृथ्वीराज चव्हाण यांना पोटनिवडणुकीचं तिकीट देण्यासाठी अनुकूल असल्याची माहिती आहे.

राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राचा विचार केला, तर पहिल्यापासून सातारा जिल्ह्याची ओळख राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी राहिली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच या जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड राहिली. गेल्या 2 टर्म छत्रपती उदयनराजे भोसले हेच राष्ट्रवादीकडून खासदार म्हणून निवडून येत आहेत. यंदाही त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळवला. मात्र तीनच महिन्यात त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.

मे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव केला होता. उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 मतं, तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार498 मतं मिळाली. उदयनराजे भोसले यांनी मागील 2014 च्या निवडणुकीत जवळपास साडेतीन लाख मतांनी विजय मिळवला होता. मात्र यंदा त्यांची आघाडी निम्म्याने घटली. 2014 मध्ये उदयनराजे भोसले 3 लाख 66 हजार 594 मतांनी विजयी झाले होते. यंदा उदयनराजेंना इतकं लीड घेता आलं नाही. 2019 च्या निवडणुकीत राजेंना 1,26,528 मतांनी विजय मिळवता आला.

या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं होतं. यावेळी या मतदारसंघात 60.33 टक्के मतदानाची नोंद झाली होती. 2014 च्या तुलनेत यावेळी 3.33 टक्क्यांनी मतदान वाढले. या मतदारसंघात छत्रपती उदयनराजे भोसले आणि भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.