मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेसाठी शिफारस केलेली 12 नावे लवकर जाहीर करा, अन्यथा… : पृथ्वीराज चव्हाण

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 12 नावांच्या शिफारस यादीचा राज्यपालांनी आदर केला पाहिजे, असे चव्हाण म्हणाले

मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेसाठी शिफारस केलेली 12 नावे लवकर जाहीर करा, अन्यथा... : पृथ्वीराज चव्हाण
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 4:07 PM

सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विधानपरिषदेसाठी 12 सदस्यांच्या नावांची शिफारस यादी (Vidhan Parishad MLC List) राज्यपालांना दिली आहे. नावांची घोषणा लवकरात लवकर करावी, अन्यथा याचा संदेश बाहेर चुकीचा जाऊ शकतो, असं मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केलं. (Prithviraj Chavan says Governor should announce Vidhan Parishad MLC List suggested by CM quickly)

राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे 15 दिवसांच्या मुदतीची शिफारस करण्यात आली आहे, याविषयी पृथ्वीराज चव्हाण यांना विचारण्यात आले. “राज्यघटनेप्रमाणे विधानपरिषदेमध्ये 12 सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार राज्याच्या मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांना असतो. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी 12 नावांची शिफारस यादी राज्यपाल यांना दिली आहे. या शिफारसीचा राज्यपालांनी आदर केला पाहिजे” असे चव्हाण म्हणाले.

“राज्यपाल नियुक्त बारा जणांच्या नावांची घोषणा लवकरात लवकर केली पाहिजे. यामध्ये उशीर झाला तर यात राजकारण होत आहे, असा चुकीचा संदेश जाऊ शकतो. राजकीय नेत्यांनी काहीही सांगितलं असलं तरी राज्यपालांनी राज्यघटनेचा आदर केला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे” असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी 6 नोव्हेंबरला देण्यात आली होती. 15 दिवसांत राज्यपालांनी दिलेल्या यादीतील नावं जाहीर करावीत, अशी शिफारस ठाकरे सरकारकडून करण्यात आली. म्हणजेच 21 नोव्हेंबरपर्यंत राज्यपालांना नावावर निर्णय घ्यावा लागणार आहे. महाविकास आघाडी सरकारने मुदतीची शिफारस करून राज्यपालांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, केंद्राप्रमाणे राज्यातही संसदीय लोकशाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा निर्णय राज्यपालांवर बंधनकारक आहे. विधानपरिषदेवर कोणाला घ्यायचं हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ठरवतं आणि त्या नावांची यादी राज्यपालांकडे देतं. राज्यपालांना 167 कलमाखाली सल्ला देता येतो, माहिती विचारता येते किंवा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करता येते. पण मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांनी घेतलेला निर्णय बदलता येत नाही, अशी माहिती घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी दिली होती. राज्यपालांनी किती वेळात निर्णय घ्यायचा हे लिहिलेलं नाही. पण त्यांनी जास्त वेळ लावणं चुकीचं आहे, असं मतही उल्हास बापट यांनी व्यक्त केलं आहे.

12 सदस्यांमध्ये कोणाची नावं?

काँग्रेस

1) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा 2) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा 3) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा 4) अनिरुद्ध वनकर – कला

राष्ट्रवादी काँग्रेस

(Prithviraj Chavan says Governor should announce Vidhan Parishad MLC List suggested by CM quickly)

1) एकनाथ खडसे – सहकार आणि समाजसेवा 2) राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा 3) यशपाल भिंगे – साहित्य 4) आनंद शिंदे – कला

शिवसेना

1) उर्मिला मातोंडकर – कला 2) नितीन बानगुडे पाटील – 3) विजय करंजकर – 4) चंद्रकांत रघुवंशी –

संबंधित बातम्या :

राज्यपाल नियुक्त 12 जागांचा तिढा वाढला, ठाकरे सरकारकडून 15 दिवसांच्या मुदतीची शिफारस

विधानपरिषद : राष्ट्रवादीच्या यादीत खडसे, शेट्टी, आनंद शिंदेंचं नाव, शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानुगडे

(Prithviraj Chavan says Governor should announce Vidhan Parishad MLC List suggested by CM quickly)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.