धन्यवाद, संजय राऊत!; अजित पवार असं का म्हणाले?

Ajit Pawar on Sanjay Raut : अजित पवार यांनी संजय राऊत यांचे आभार का मानले? वाचा सविस्तर...

धन्यवाद, संजय राऊत!; अजित पवार असं का म्हणाले?
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 3:00 PM

पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांचे आभार मानले आहेत. धन्यवाद! संजय राऊत, असं अजित पवार म्हणालेत. संजय राऊत यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांना महाविकास आघाडीचे बीग बी म्हटलं आहे.  त्याला अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.  त्यांनी आदिपुरूष सिनेमावर प्रतिक्रिया दिली आहे.

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औंरगजेबच्या कबरीवर जात माथा टेकवला. त्यावर बोलताना औरंगजाबाबद्दल महाराष्ट्रात काय मत आहे हे सगळ्यांना ठावूक आहे. मात्र कोणी कुठे जायचे हे ज्याने त्याने ठरवायचे आहे, असं अजित पवार म्हणालेत.

बीआरएस महाराष्ट्रात प्रयत्न करतंय. कोणत्याही पक्षाला आपल्या पक्षाची वाढ करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे आणि भाजप आणि एकनाथ शिंदे एकत्र लढणार असं चित्र आहे. त्यामुळे अनेकांना आपल्याला उमेदवारी मिळणार नाही, असं वाटतंय त्यामुळे अनेकजण बीआरएसमध्ये जात आहेत, असं म्हणत बीआरएसच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एन्ट्रीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आदिपुरुष असेल किंवा परपुरुष असेल… अशा चित्रपटांची कशाला चर्चा करताय. वाद निर्माण करून चित्रपटाला प्रसिद्धी मिळवण्यात येते, असं म्हणत त्यांनी आदिपुरुष सिनेमाच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीची आमदारांची बैठक आधीच ठरलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील घडामोडींचा यांच्याशी काहीही संबंध नाही. महाविकास आघाडी आहे. उगीच काही बातमी चालवू नका, असं अजित पवार म्हणालेत.

विधीमंडळात ज्या विरोधकांकडे अधिक संख्या असते त्यांचा विरोधीपक्षनेता होतो. तुम्ही जे सांगताय त्याबद्दल आम्ही कोणता विचार केलेला नाही. मात्र तुम्ही ही गोष्ट लक्षात दिलीय त्यानंतर विचार करु. महाविकास आघाडीबाबातचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी घेतात. मी याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारेन, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. गद्दार दिवस फार काही साजरा करण्यासारखा आहेत, असं मला वाटत नाही, असं त्यायंनी म्हटलं आहे.

पावसाने ओढ दिल्याने कारखाने वेळेवर सुरू होण्याबाबत साशंकता आहे. कारखाने कधी सुरु करायचा याचा अधिकार सरकारला आहे. मात्र धरणात पाणी नसल्याने ऊस पिकाला पाणी मिळणे अवघड झालं आहे. कारण पिण्याचे पाणी मिळणं अवघड आहे, असं अजित पवार म्हणालेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.