आधी भुजबळ, मग धनंजय मुंडे अन् आता दिलीप वळसे पाटील; आंबेगावमध्ये शरद पवारांची तोफ धडाडणार, वाचा सविस्तर…

Dilip Walse Patil Supporters meet Sharad Pawar : ठरलं तर! आधी छगन भुजबळ यांचा नाशिक मतदारसंघ, मग धनंजय मुंडे यांचं बीड अन् आता दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात शरद पवारांची तोफ धडाडणार; 'त्या' वक्तव्याचा समाचार घेणार?

आधी भुजबळ, मग धनंजय मुंडे अन् आता दिलीप वळसे पाटील; आंबेगावमध्ये शरद पवारांची तोफ धडाडणार, वाचा सविस्तर...
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 10:54 AM

बारामती, पुणे | 22 ऑगस्ट 2023 : मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तोफ धडाडणार आहे. सप्टेंबर महिन्यात शरद पवार आंबेगाव मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. वळसे पाटलांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर पवार गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आंबेगावमधील राष्ट्रवादी पदाधिकऱ्यांनी पवारांची भेट घेऊन सभेची तारीख मागितली आहे.

अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अनेक अनपेक्षित चेहरे अजित पवारांसोबत दिसले. यात भुवया उंचावणारं एक नाव होतं ते म्हणजे शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे दिलीप वळसे पाटील. दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याचबरोबर वळसे पाटलांनी काल केलेल्या एका वक्तव्यामुळे तर चर्चांना उधाण आलं. त्यानंतर आता शरद पवार वळसे पाटलांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत.

अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवारांकडून ठिकठिकाणी सभा घेतल्या जात आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिकमध्ये शरद पवार यांनी पहिली जाहीर सभा घेतली. त्यानंतर नुकतंच धनंजय मुंडे यांच्या बीडमध्ये सभा झाली. आता दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात शरद पवार सभा घेणार आहेत. त्यामुळे वळसे पाटलांच्या मतदारसंघात शरद पवार काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शिरूर आंबेगावमध्हीये राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. दिलीप वळसे पाटलांच्या समर्थकांनी शरद पवारांची आज भेट घेतली. शिरूर-आंबेगाव मतदारसंघाच्या 39 गावातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली. बारामतीत गोविंदबाग पवारांच्या निवासस्थानी जात ही भेट घेतली. वळसे पाटलांचे समर्थक देवदत्त निकम यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आंबेगावमध्ये सभा घेण्याची विनंती केली आहे.

शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असं आपण म्हणतो. परंतु एकट्याच्या ताकतीवर या महाराष्ट्रातील जनतेने एकदाही बहुमत दिलं नाही. एकदाही स्वतःच्या ताकतीवर मुख्यमंत्री केलं नाही, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यानंतर वळसे पाटलांनी स्पष्टीकरण देत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असं म्हटलं. पण वळसे पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता शरद पवार या सभेतून वळसे पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का हे पाहणं महत्वाचं राहील.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.