राज ठाकरेंशी वैर संपलं? पुण्यात ब्रृजभूषण सिंहांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, म्हणाले ती गोष्ट आता…

मे 2022मध्ये राज ठाकरे यांनी आयोजित केलेला अयोध्या दौरा होऊ देणार नाही, अशी भूमिका ब्रृजभूषण सिंह यांनी घेतली होती.

राज ठाकरेंशी वैर संपलं? पुण्यात ब्रृजभूषण सिंहांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, म्हणाले ती गोष्ट आता...
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 1:47 PM

अभिजित पोते, पुणेः उत्तर भारतात विशेषतः अयोध्येत राज ठाकरेंना (Raj Thackeray) येण्यापासून रोखणारे खासदार ब्रृजभूषण सिंह (Brujbhushan singh) अचानक मवाळ झालेत का? राज ठाकरेंच्या भूमिकेच्या विरोधात जी प्रखर वक्तव्य त्यांनी केली होती, तो विरोध यापुढे होणार नाही का? असे सवाल विचारले जात आहेत. कारणही तसंच आहे. बृजभूषण सिंह यांनी पुण्यात (Pune) नुकतंच केलेलं वक्तव्य. राज ठाकरे यांना माझा वैयक्तिक विरोध नाही. मी जी काही भूमिका मांडली होती, ती गोष्ट आता खूप जुनी झाली आहे, असं ब्रृजभूषण सिंह म्हणालेत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त ब्रृजभूषण सिंह पुण्यात दाखल झालेत. भारतीय कुस्ती महासंघाचे ते अध्यक्ष आहेत.

यावेळी महाराष्ट्रातील जनतेनेने त्यांचं जंगी स्वागत केलं. महाराष्ट्र से मुझे हमेशा प्यार मिलता आ रहा है.. इसलिए मै यहाँ की जनता का आभारी हूँ, अशा शब्दात बृजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली.

पुण्यात सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम विजेता आज ठरणार आहे. दोन गटातील अंतिम लढतींकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मॅट विभागात नांदेडचा शिवराज राक्षे तर नाशिकचा हर्षवर्धन सदगीर या दोहोंमध्ये सामना होणार आहे. तर माती विभागात सोलापुरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड या दोघांमध्ये अंतिम लढत होणार आहे.

या अंतिम सामन्यांसाठी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण सिंह यांचं नुकतंच पुण्यात आगमन झालंय. पुण्यात आज या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. संध्याकाळी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हेदेखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनांमुळे ब्रृजभूषण सिंह यांनी त्यांना आव्हान दिलं होतं. मे 2022मध्ये राज ठाकरे यांनी आयोजित केलेला अयोध्या दौरा होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे राज ठाकरेंना हा दौरा रद्द करावा लागला होता.

त्यानंतर ब्रृजभूषण सिंह कुस्तीस्पर्धेनिमित्त महाराष्ट्रात येणार म्हटल्यानंतर राज ठाकरे आणि मनसैनिक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र खेळ आणि राजकारण या दोन्ही वेगळ्या गोष्टी असल्याचं सांगत, मनसेने शांततेची भूमिका घेतली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.