चंद्रकांतदादांमुळे माझा विजय सोपा, पुणे पदवीधर मतदारसंघ खेचून आणताच राष्ट्रवादीच्या अरुण लाड यांचा टोला

ज्या पुणे पदवीधर मतदारसंघात चंद्रकांत पाटलांचा दबदबा होता, तिथेच भाजपचा उमेदवार मोठ्या फरकारने पराभूत झाला

चंद्रकांतदादांमुळे माझा विजय सोपा, पुणे पदवीधर मतदारसंघ खेचून आणताच राष्ट्रवादीच्या अरुण लाड यांचा टोला
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 10:41 AM

Pune Graduate Constituency Result | पुणे : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाला (Pune graduate constituency result) महाविकास आघाडीने सुरुंग लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड (Arun Lad wins) यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवून भाजप (BJP) आणि मुख्यत्वे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना हादरा दिला. चंद्रकांतदादांनीच माझा विजय सोपा केला, असा टोलाही अरुण लाड यांनी विजयानंतर लगावला. (Pune graduate constituency winner Arun Lad taunts Chandrakant Patil)

“चंद्रकांतदादांनी माझा विजय सोपा केला. कारण ते दोन वेळा पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून गेले होते, पण ज्या पदवीधरांच्या जीवावर ते निवडून गेले होते, त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. त्यांनी टीव्हीवर मुलाखत दिली, की मी दोन वेळा निवडून आलो आहे, माझं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी भाजप उमेदवार संग्राम देशमुख (Sangram Deshmukh) यांना निवडून द्या. पण तुम्ही काही कामच केलं नाही, तर देशमुखांना काय निवडून द्यायचं. लोकांना हे पटलं नाही, आपल्यावर झालेला अन्याय खटकला. त्यामुळे मोठ्या मताधिक्क्याने मला निवडून दिलं.” अशी प्रतिक्रिया अरुण लाड यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.

अरुण लाड यांनी पहिल्या फेरीतच 48 हजार 824 मतांनी बाजी मारली. अरुण लाड यांना एकूण 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली तर विरोधी उमेदवार संग्राम देशमुख यांना 73 हजार 321 मतं पडली.

चंद्रकांत पाटलांना धक्का

पदवीधर निवडणुकीचा हा निकाल म्हणजे भाजपला जसा धक्का आहे, त्यापेक्षा अधिक धक्का चंद्रकांत पाटलांना आहे. कारण ज्या पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचा किंबहुना चंद्रकांत पाटलांचा दबदबा होता, तिथेच भाजपचा उमेदवार मोठ्या फरकारने पराभूत झाला. महत्त्वाचं म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी 12 वर्षे म्हणजे दोन टर्म पुणे पदवीधर मतदारसंघाचं नेतृत्त्व केलं होतं, तिथेच भाजपचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव होणं, हा भाजपपेक्षा चंद्रकांत पाटलांसाठी सेटबॅक आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात दोन पाटील प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. एकीकडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर जे जागा राखण्याचं आव्हान होतं, ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच पेललं होतं.

संग्राम देशमुख कसे हरले?

ज्या मतदारसंघात चंद्रकांत पाटील सलग दोनवेळा जिंकले, त्या मतदारसंघात संग्राम देशमुख कसे हरले हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जाणे साहजिक आहे. चंद्रकांत पाटील यांनी या मतदारसंघात पूर्ण ताकद लावली होती. काहीही करुन ही जागा राखण्याचा चंग भाजपने बांधला होता. त्यासाठी उमेदवार निवडीपासून भाजपने आखीव-रेखीव नियोजन केलं.

महाविकास आघाडीकडून अरुण लाड यांना उमेदवारी निश्चित होती. त्यामुळेच भाजपने त्या तोडीचा उमेदवार निवडला. त्यासाठी सांगली जिल्ह्यातील संग्राम देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. पुणे पदवीधर मतदारसंघ हा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा आहे. मात्र या मतदारसंघाची रणभूमी ही सांगली होती. कारण अरुण लाड आणि संग्राम देशमुख दोन्ही उमेदवार सांगलीचेच आहेत.

अरुण लाड यांनी सहा वर्षापूर्वीच आपली ताकद दाखवली होती. त्यामुळे या निवडणुकीत ते कोणत्या तयारीने उतरले असतील याचा आपण अंदाज बांधू शकतो.

मागील निवडणुकीत काय झालं होतं?

मागील पदवीधर निवडणुकीमध्ये उमेदवारी न दिल्याने बंडखोरी करणाऱ्या अरुण अण्णा लाड यांना तब्बल 48 हजार इतकी मतं पडली होती. तर राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार सारंग पाटील यांना 50 हजाराच्या आसपास मतं पडली होती. तर भाजपचे तत्कालीन विजयी उमेदवार चंद्रकांत पाटील यांना 52 हजाराच्या आसपास मते पडली होती. अरुण लाड यांच्या त्या वेळच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. (Pune graduate constituency winner Arun Lad taunts Chandrakant Patil)

महत्त्वाचे निकाल

पुणे पदवीधर – अरुण लाड (राष्ट्रवादी) – विजयी पुणे शिक्षक – जयंत आसगावकर (काँग्रेस) – आघाडीवर नागपूर पदवीधर – अभिजीत वंजारी (काँग्रेस) – आघाडीवर औरंगाबाद पदवीधर – सतीश चव्हाण (राष्ट्रवादी) – विजयी अमरावती शिक्षक – किरण सरनाईक (अपक्ष) – आघाडीवर धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य – अमरिश पटेल (भाजप) – विजयी

संबंधित बातम्या :

जिथे चंद्रकांत पाटील सलग जिंकले, तिथे संग्राम देशमुख कसे हरले?

धुळे-नंदुरबारच्या निकालाचं आश्चर्य नाही, पुणे-नागपूरचे निकाल म्हणजे महाविकास आघाडीला लोकांचा पाठिंबा- शरद पवार

पुणे आणि नागपूर पदवीधरमध्ये भाजपला मोठा धक्का!, हिंमत असेल तर एकटे लढा, चंद्रकांत पाटलांचं सत्ताधाऱ्यांना आव्हान

‘भाजपने पुण्याची हातातली जागा गमावली तर चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा’

(Pune graduate constituency winner Arun Lad taunts Chandrakant Patil)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.