नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर नाराजी दूर? मेधा कुलकर्णी यांचं पहिलं ट्विट, म्हणाल्या…

Medha Kulkarni Tweet About Nitin Gadkari Meeting : नितीन गडकरींनी भेट घेताच मेधा कुलकर्णी यांचं ट्विट; या भेटीनंतर नाराजी दूर झाली का? गडकरी आले तेव्हा कोणते खाद्यपदार्थ बनवले होते? या भेटीबाबतची महत्वाची माहिती... वाचा सविस्तर...

नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर नाराजी दूर? मेधा कुलकर्णी यांचं पहिलं ट्विट, म्हणाल्या...
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 11:00 AM

पुणे | 13 ऑगस्ट 2023 : पुण्यातील कोथरूड मतदारसंघाच्या माजी आमदार भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी ट्विट करत उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली. काल पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्घाटन पार पडलं. मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर मेधा कुलकर्णी यांनी नाराजी बोलून दाखवली. जर चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा हा मुद्दा मी सर्वात आधी लक्षात आणून दिला तर मग श्रेय एकदोघांचं कसं? असा सवाल मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला. त्यानंतर नितीन गडकरी यांनी मेधा कुलकर्णी यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर मेधा कुलकर्णी यांनी आज ट्विट करत या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.

मेधा कुलकर्णी यांनी ट्विट करत या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. नितीन गडकरी घरी आल्याचा मनोमन आनंद झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांच्या आवडत्या पाणी पुरी, शेवपुरीचा बेत झाल्याचं मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं.

काल मा. नितीन गडकरी जी यांनी अतिशय धावपळीत असूनही आवर्जून माझ्या घरी भेट दिली. कुटुंबीय, कार्यकर्ते, नागरिक यांची भेट घेतली. विचारपूस केली. मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांच्या आवडत्या पाणी पुरी, शेवपुरी याचा आस्वाद घेतला, असं ट्विट मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे.

विस्मयकारक कर्तुत्व तर त्यांचे आहेच पण दिलदार, संवेदनशील अशीच त्यांची आजपर्यंतची ओळख त्यांनी पुन्हा सिद्ध केली. व्यक्ती पदाने तर आहेच पण मनानेही मोठी आहे. मा. नितीन गडकरीजी तुमच्याकडून मला खूप शिकण्यासारखे आहे. मनःपूर्वक धन्यवाद, असं म्हणत मेधा कुलकर्णी यांनी या भेटीचे तपशील दिले आहेत.

मेधा कुलकर्णी यांनी ‘असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे’ असं म्हणत मेधा कुलकर्णी यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती.

ॉमाझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी….चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरीजी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी?, अशी पोस्ट मेधा कुलकर्णी यांनी केली आहे.

या सगळ्या नाराजीनंतर नितीन गडकरी यांनी चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मेधा कुलकर्णी यांनी यापुलासाठी पाठपुरावा केल्याचं म्हटलं. शिवाय या कार्यक्रमानंतर गडकरींनी भेट मेधा कुलकर्णी यांची त्यांच्या घरी जात भेट घेतली. या भेटीत मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर झाली का? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

Non Stop LIVE Update
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?.
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?.
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका.
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप.
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला.
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?.
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक.