PMC election 2022 : प्रभाग अकरा भाजपाचा की काँग्रेस-राष्ट्रवादीचा? वाचा, आरक्षणानुसार बदललेली वॉर्डरचना आणि उमेदवार
2017च्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 11 हा रामबाग कॉलनी-शिवतीर्थ नगर याठिकाणच्या पॅनेलवर नजर टाकल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व याठिकाणी दिसून आले. यावेळी प्रभाग क्रमांक अकरामध्ये बोपोडी-पुणे विद्यापीठ परिसर येणार आहे.
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची (PMC election 2022) रणधुमाळी सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरुद्ध भाजपा अशी रंगतदार लढत या पालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण (Ward wise reservation) सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोडत प्रक्रिया मे महिन्यात पार पडली. पुणे महापालिकेतील 58 प्रभागातील 173 जागांसाठी यावेळी मतदान पार पडणार आहे. मागीलवेळी प्रभागरचना बदलली होती. चार नगरसेवकांचे पॅनल प्रत्येक प्रभागात होते. 2017च्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 11 हा रामबाग कॉलनी-शिवतीर्थ नगर याठिकाणच्या पॅनेलवर नजर टाकल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व याठिकाणी दिसून आले. यावेळी प्रभाग क्रमांक अकरामध्ये बोपोडी-पुणे विद्यापीठ परिसर येणार आहे. भाजपाचे वर्चस्व याठिकाणी मागील वेळी दिसून आले होते.
अशी रंगली लढत
– प्रभाग अकराच्या अ मध्ये संतोष सिताराम अमराळे (भाजपा), अनिल गणपत घोलप (शिवसेना) तर दीपक मानकर (राष्ट्रवादी) यांच्यात लढत पाहायला मिळाली.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | अनिल गणपत घोलप | -- |
भाजपा | सिताराम अमराळे | -- |
काँग्रेस | -- | -- |
राष्ट्रवादी | दीपक मानकर | दीपक मानकर |
मनसे | -- | -- |
इतर | -- | -- |
– प्रभाग अकराच्या ब मध्ये आशा राजू भगत (अपक्ष), वृषाली साधू धुमाळ (मनसे), अश्निनी जाधव (राष्ट्रवादी), छाया अजय मारणे (भाजपा), सविता सुहास मते (शिवसेना) यांच्यात लढत झाली.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | सविता सुहास मते | -- |
भाजपा | छाया अजय मारणे | छाया अजय मारणे |
काँग्रेस | -- | -- |
राष्ट्रवादी | अश्निनी जाधव | -- |
मनसे | वृषाली साधू धुमाळ | -- |
इतर | आशा राजू भगत | -- |
– प्रभाग अकराच्या क मध्ये अर्चना सागर भगत (अपक्ष), मनिषा संदीप बुटाला (भाजपा), सुजाता शिवदास करवंदे (अपक्ष), वैशाली राजेंद्र मराठे (काँग्रेस), शर्मिला नितीन शिंदे (शिवसेना), स्नेहन गणेश शिंदे (मनसे) यांच्यात लढत झाली.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | शर्मिला नितीन शिंदे | -- |
भाजपा | मनिषा संदीप बुटाला | -- |
काँग्रेस | वैशाली राजेंद्र मराठे | वैशाली राजेंद्र मराठे |
राष्ट्रवादी | -- | -- |
मनसे | स्नेहन गणेश शिंदे | -- |
इतर | अर्चना सागर भगत | -- |
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | जयदीप पडवळ | -- |
भाजपा | -- | -- |
काँग्रेस | अॅड. रामचंद्र आत्माराम कदम | अॅड. रामचंद्र आत्माराम कदम |
राष्ट्रवादी | -- | -- |
मनसे | संदीप ज्ञानोबा जोरी | -- |
इतर | रवींद्र धोंडिबा मानकर | -- |
विजयी उमेदवार कोण?
रामबाग कॉलनी-शीवतीर्थ नगर या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दीपक मानकर अ मधून, भाजपाच्या छाया अजय मारणे ब मधून, वैशाली राजेंद्र मराठे या विभाग क मधून काँग्रेसतर्फे तर अॅड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ आत्माराम कदम हे ड मधून काँग्रेसतर्फे निवडून आलेले उमेदवार आहेत.
प्रभाग क्र. 11, प्रभागातील महत्त्वाची ठिकाणे – बोपोडी-पुणे विद्यापीठ (2022)
बोपोडी गावठाण, प्रगतीनगर, चेतक सोसायटी, नाईक चाळ, भोसलेनगर, पुणे विद्यापीठ, कर्मवीर सोसायटी, मिथिलानगरी, भीमज्योतनगर, यशवंत सोसायटी, मॉडेल कॉलनी, लक्ष्मीनगर सोसायटी इ.
आरक्षण कसे? (2022)
यावेळी बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हा प्रभाग जागा क्रमांक 11 अ हा अनुसूचित जाती (महिला), ब हा सर्वसाधारण महिला तर क सर्वसाधारण उमेदवारासाठी राखीव असणार आहे.