PMC election 2022 : पुण मनपाच्या प्रभाग क्र. 26 मध्ये पुन्हा महाविकास आघाडी झालीच तर घड्याळ नक्की बाजी मारणार…
येत्या निवडणुकीत जर मागील सरकारच्यावेळी जशी महाविकास आघाडीने एकीचे वज्रमूठ बांधली तर या चारही जागांवर राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचा उमेदवार विजयी होण्यास वेळ लागणार नाही. मात्र आता आघाडीची गणितं आणि आता नव्या शिंदे-सरकारच्या गणितामुळे आगामी निवडणुकीत काय गणितं मांडली जातात त्यावरच पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 26 अ, ब, क आणि ड चं भवितव्य ठरणार आहे.
पुणेः राज्यातील महानगरपालिके मुंबईनंतर महत्वाची मानली जाणारी महानगरपालिका म्हणजे पुणे. या महानगरपालिकेने मागील वर्षीच राज्यातील सगळ्यात मोठी पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) म्हणूनही बहुमानही मिळवला आहे. त्यामुळे आता राज्यातील महत्वाच्या राजकीय पक्षांनी महानगरपालिका निवडणुका जाहीर होताच सगळं ताकद आता पुणे महानगरपालिकेकडे वळविले आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 26 मध्ये (PMC Ward No. 26) चार विभाग आहेत. या चार विभागामध्ये दोन जागा शिवसेनेच्या आहेत तर राहिलेल्या दोन जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवारांनी बाजी मारली आहे.
मविआची पुन्हा वज्रमूठ हवी
त्यामुळे येत्या निवडणुकीत जर मागील सरकारच्यावेळी जशी महाविकास आघाडीने एकीचे वज्रमूठ बांधली तर या चारही जागांवर राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचा उमेदवार विजयी होण्यास वेळ लागणार नाही. मात्र आता आघाडीची गणितं आणि आता नव्या शिंदे-सरकारच्या गणितामुळे आगामी निवडणुकीत काय गणितं मांडली जातात त्यावरच पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 26 अ, ब, क आणि ड चं भवितव्य ठरणार आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | अल्हाट प्राची आशिष | अल्हाट प्राची आशिष |
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी | साळवे अस्मिता राहुल | |
भारतीय काँग्रेस पार्टी | शरणागत राधिका परशुराम | |
भारतीय जनता पार्टी | सूर्यवंशी अश्विनी योगेश |
शिवसेना भारी पडणार
पुणे महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत प्रभाग क्र. 26 मध्ये दोन जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या तर दोन जागांमध्ये एक जागा ही भाजपला तर एक जागा राष्ट्रवादीला मिळाली होती. त्यामुळे आता पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात असला तरी भाजपच्या उमेदवाराबरोबर काटे की टक्कर होणार आहे एवढं मात्र नक्की असणार आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | भानगिरे प्रमोद उर्फ नाना वसंत | भानगिरे प्रमोद उर्फ नाना वसंत |
भारतीय जनता पार्टी | जीवन उर्फ बाप्पू तुकाराम जाधव | |
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी | फारुख इनामदार | |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | सय्यद शोएब शफी |
वॉ़र्ड कुठून पासून कुठपर्यंत
पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 26 मध्ये वानवडी गावठा-वैदुवाडी असा परिसर येत असून या प्रभागाची एकूण लोकसंख्या ही 59020 एवढी आहे. यामध्ये 10993 ही अनुसूचित जातीची लोकसंख्या तर अनुसुचित जमतीची 624 एवढी लोकसंख्या आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | वैष्णव दीपक घुले | |
भारतीय जनता पार्टी कमळ | स्वाती कुरणे-भानगिरे | |
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी | लोणकर नंदा नारायण | लोणकर नंदा नारायण |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | विजया पोपट वाडकर | |
वाघुले प्रभावती सुभाष | जनता दल(सेक्यलर) |
तिन्ही पक्षाचा निर्णय महत्वाचा
पुणे महानगरपालिकेची ही निवडणूक आता जुलै 2022 मध्ये झालेल्या सत्ताबदलामुळे महत्वाची ठरणार आहे. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन निवडणूक लढविली तर मात्र इतर पक्षांना त्याचा फटका बसतो की फायदा होतो ते या तिन्ही पक्षांच्या निर्णयावर ठरणार आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भारतीय जनता पार्टी | संजय (तात्या) गुलाब घुले | संजय (तात्या) गुलाब घुले |
शिवसेना | तानाजी ज्ञानदेव लोणकर | |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | घुले अमित कृष्णा | |
महाराष्ट्र नवनिर्माण सेना | सय्यद अझरुद्दीन बशीर | |
जनता दल | मोळंकीरे शिवकुमार शालिवान | |
अपक्ष | फारुख बखला |