PMC election 2022 : Ward 1 Dhanori Vishrantwadi : पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड नंबर एकमध्ये कोण काढेल पहिला नंबर?
Pune Municipal Corporation election 2022 : पुणे प्रभाग क्रमांक एक (Pune Ward no. 01) हा कळस धानोरी या नावानं ओळखला जातो.
पुणे : पुणे महागनगर पालिकेच्या निवडणुका (Pune Municipal Corporation) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच पुणे महानगर पालिकेवर 2022च्या निवडणुकीमध्ये कोण विजयी झेंड फडकावतं, हे याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, 2022 च्या निवडणुकीत पुणे महानगरपालिकेसाठी नवी प्रभाग रचना करण्यात आली आहे. आरक्षणही नव्यानं जाहीर करण्यात आलं. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इतर पालिकांप्रमाणेच पुणे पालिकेतील राजकीय (Pune Politics) समीकरणंही 2022 च्या निवडणुकीमध्ये नेमकी कशी राहतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे प्रभाग क्रमांक एक (Pune Ward no. 01) हा कळस धानोरी या नावानं ओळखला जातो. 2017 साली या प्रभागामध्ये एकूण चार वॉर्ड होते. मात्र आता नव्या प्रभाग प्रचनेप्रमाणे प्रभाग क्रमांकमध्ये तीन वॉर्ड असणार आहे. शिवाय प्रभाग निहाय आरक्षणावर नजर टाकली, तर अनेक गणितं बदललेली आहे.
प्रभाग क्रमांक एकच्या चार वॉर्डपैकी तीन वॉर्डमध्ये 2017 साली भाजपने विजय मिळवला होता. मात्र यंदा लढत ही तीन वॉर्डमध्येच असणार आहे. त्यामुळे 2017चाच सिलसिला 2022मध्ये भाजपनं कायम ठेवतं का, याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय. 2017 सालच्या कोणत्या वॉर्डमधून किती उमेदवार जिंकले? प्रभाग क्रमांक एकचा कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित झाला आहे? एकूण जातीनिहाय लोकसंख्या नेमकी या प्रभागाची किती आहे? याचा सविस्तर आढावा घेऊयात..
पुणे महानगर पालिका : प्रभाग क्रमांक 01
प्रभाक क्रमांक 1 चं नाव : धानोरी विश्रांतवाडी
2017 साली प्रभाग क्रमांक 1 च्या कोणत्या वॉर्डमधून कोण विजयी?
- 1 अ – उठार किरण निलेश भाजप अनुसूचित जाती महिला 11830 मतं (नोटा 1500)
- 1 ब – मारुती (नाना) सांगडे भाजप अनुसूचित जमाती 14560 (नोटा 3056)
- 1 क – टिंगरे रेखा चंद्रकात- राष्ट्रवादी काँग्रेस नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला 15743 (नोटा 431)
- 1 ड – अनिल (बॉबी) वसंतराव टिंगरे – भाजप सर्वसाधारण 18307 (नोटा 906)
पुणे पालिका प्रभाग क्रमांक 1 : लोकसंख्या
- एकूण लोकसंख्या 55488
- अनुसूचित जाती 10927
- अनुसूचित जमाती 1652
प्रभाग क्रमांक 1 : कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित?
- 1 अ अनुसूचित जाती
- 1 ब अनुसूचित जमाती महिला
- 1 क सर्वसाधारण
पुणे महापालिका प्रभाग 1 धानोरी विश्रांतवाडी : 1 अ
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
मनसे | ||
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी | ||
शिवसेना |
पुणे महापालिका प्रभाग 1 धानोरी विश्रांतवाडी : 1 ब
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
मनसे | ||
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी | ||
शिवसेना |
पुणे महापालिका प्रभाग 1 धानोरी विश्रांतवाडी : 1 क
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
भाजप | ||
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
मनसे | ||
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी | ||
शिवसेना |
पुणे महानगरपालिकेच्या नव्या प्रभाग रचनेप्रमाणे आता पुणे पालिकेत एकूण 173 वॉर्ड आहेत. त्यापैकी 87 वॉर्ड हे आरक्षित करण्यात आले आहेत. यातील अनुसूचित जातींसाठी एकूण 23 वॉर्ड राखीव करण्यात आले आहेत. त्यापैकी महिलांसाठी 12 वॉर्ड आरक्षित आहेत. तर अनुसूचित जमातींसाठी एकूण दोन 2 वॉर्ड राखीव करण्यात आले असून त्यापैकी महिलांसाठी 1 वॉर्ड आरक्षित करण्यात आलाय. दरम्यान, सर्वसाधारण म्हणून ओपनसाठी एकूण जागा 148 वॉर्ड असून त्यापैकी महिलांसाठी 78 वॉर्ड आरक्षित केले गेलेत.