PMC Election 2022 Ward 58 : कात्रजच्या वॉर्डात कुणाचे भाग्य उजळणार? सर्वच पक्षांची जोरदार तयारी
वॉर्ड क्रमांक 58 मध्येही याच दोन पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 2017 च्या निवडणुकीत या महापालिकेचे एकूण 41 वॉर्ड होते. यंदाच्या निवडणुकीत वॉर्डची संख्या वाढून 58 झाली आहे.
पुणे : राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे पुणे महापालिके (Pune Municipal Corporation)ची यंदाची निवडणूक सर्वच प्रमुख पक्षासाठी प्रतिष्ठा पणाला लावणारी ठरणार आहे. सध्या ही महापालिका भाजप (BJP)च्या ताब्यात आहे. मात्र भाजपकडे सत्तेच्या चाव्या आपल्या हाती मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)कडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या नेत्तृत्वाखाली भाजपपुढे तगडे आव्हान उभे करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वॉर्ड क्रमांक 58 मध्येही याच दोन पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 2017 च्या निवडणुकीत या महापालिकेचे एकूण 41 वॉर्ड होते. यंदाच्या निवडणुकीत वॉर्डची संख्या वाढून 58 झाली आहे. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्डमध्ये काही भौगोलिक बदल झाला आहे. हा बदल कोणाचे नशीब बदलतोय, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
पुणे महापालिका वॉर्ड 58 अ
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
वॉर्ड क्रमांक 58 ची लोकसंख्या
एकूण लोकसंख्या – 55730 अनुसूचित जाती – 7032 अनुसूचित जमाती – 1272
पुणे महापालिका वॉर्ड 58 ब
वॉर्डमध्ये नेमक्या कोणकोणत्या विभागांचा समावेश होतो?
कात्रज, गोकुळनगर, व्यंकटेश लेक व्हिला, शनीनगर, आंबेगाव बुद्रुक, दत्तनगर, साई कॉलनी, आरोह निवासी सोसायटी, आगम मंदिर परिसर, संतोषनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, आर्यन वर्ल्ड स्कूल, भिलारेवाडी, येवलेवाडी (भाग), चैतन्यशीला कातळनगर, स्वगृही आश्रम नगर, आरोह वस्ती. समर्थ नगर, शिवशंभो नगर, विघ्नहर्ता नगर, गुजर वस्ती, ब्लू हेवन स्कूल, टिळेकर नगर (भाग), कोंढवा बुद्रुक, गोकुळनगर, कात्रज वसाहत, सुंदर नगर, भिलारेवाडी इत्यादी.
वॉर्डातील आरक्षण
कात्रज, गोकूळनगर ‘क’ हा वॉर्ड सर्वसाधारण गटासाठी खुला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येथे रिंगणात उतरणाऱ्या मतदारांचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिका वॉर्ड 58 क
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
वॉर्ड क्रमांक 58 ची सद्यस्थिती
पुणे शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार नोंद झालेल्या लोकसंख्येच्या आधारावर यंदाची महापालिका निवडणूक होणार आहे. या महापालिकेचे तीन सदस्यांचे 57 वॉर्ड असून दोन सदस्यांचा एक असे मिळून 58 वॉर्ड असणार आहेत. तर नव्या वॉर्डरचनेनुसार एकूण 173 नगरसेवक निवडून महापालिकेत जाणार आहेत. कात्रजचा जुना वॉर्ड क्रमांक 40 हा आता नव्या वॉर्डरचनेनुसार वॉर्ड क्रमांक 58 झाला आहे. भौगोलिकदृष्ट्या वॉर्ड क्रमांक 58 हा फार मोठा आहे. या वॉर्डमध्ये कात्रजच्या चार वाड्या आणि डोंगराळ भागाचा समावेश आहे. वॉर्डमध्ये संमिश्र मतदारवर्ग आहे. स्थानिक मतदारांमध्ये आपल्या कामातून स्वतःचा ठसा उमटवणारा उमेदवाराचे नशीब याठिकाणी उजळू शकते, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.