AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात भाजप-राष्ट्रवादीत पोलखोल स्पर्धा! विकासकामांवरुन आरोपांच्या फैरी

पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या पोलखोल स्पर्धा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्ताधारी भाजपच्या कामांची पोलखोल करत आहेतत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारचं शहरात एक काम दाखवा आणि बक्षिस मिळवा, अशी घोषणाच भाजपच्या नेत्यांनी केली आहे.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात भाजप-राष्ट्रवादीत पोलखोल स्पर्धा! विकासकामांवरुन आरोपांच्या फैरी
पुणे महापालिका
| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 3:52 PM
Share

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या पोलखोल स्पर्धा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्ताधारी भाजपच्या कामांची पोलखोल करत आहेतत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारचं शहरात एक काम दाखवा आणि बक्षिस मिळवा, अशी घोषणाच भाजपच्या नेत्यांनी केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विकास कामांवरून सुरु असलेल्या आरोप – प्रत्यारोपांमुळे शहरातील राजकीय वातावरण तापण्यास आता सुरुवात झाली आहे. (Allegations between BJP and NCP leaders on the backdrop of Pune Municipal elections)

पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी भाजपची पोलखोल करण्यासाठी अनोखी स्पर्धा घेतली आहे. यात पुण्यातील नागरिकांनी व्हिडिओ आणि सेल्फी फोटो पोस्ट करणाऱ्या विजेत्या स्पर्धकास बक्षीसं देखील जाहीर केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला सत्ताधारी भाजपनेही महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिलं आहे. राज्यात गेल्या दीड वर्षात सत्तेत असलेल्या महाआघाडी सरकारने पुणे शहरासाठी केलेले एक भरीव ‘विकासकाम दाखवा’ ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि विजेत्याला 30 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केलं आहे. त्यामुळे पुण्यातील महापालिका निवडणुकीचे वारे आता किती जोरात वाहू लागले आहेत, याचा प्रत्यय या माध्यमातून येत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणूक अगदी काही महिन्यांवरून येऊन ठेपली आहे. यापूर्वीही शहरात भाजप, राष्ट्रवादीत जोरदार बॅनर वॉर पाहायला मिळालं होतं. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील स्पर्धेमुळे पुण्यात पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचं चित्र दिसून येत आहे.

महापालिका आयुक्त ऐकत नसल्याचा भाजपचा आरोप

महापालिका आयुक्त आमचं ऐकत नसल्याचा आरोप भाजपने केलाय. महापालिका आयुक्त हे महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप भाजपचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी केलाय. 23 गावांच्या विकास आराखड्यासंदर्भात न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीला महापालिकेकडून वकील दिला जात नसल्याचा आरोप बीडकर यांनी केला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 23 गावांच्या विकास आराखड्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगल्याचं दिसून येत आहे.

महापालिका आयुक्त महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. आयुक्त महापालिकेचं हित न बघता राज्य सरकारचं हित पाहत आहेत. 23 गावांच्या विकास आराखड्यासंदर्भात सुरु असलेल्या सुनावणीला महापालिकेकडून वकील दिला जात नाही. याबाबत आम्ही कायदेशीर लढाई लढणार असल्याचं गणेश बीडकर यांनी म्हटलंय.

पुणे महापालिका पक्षीय बलाबल

भाजप 99 काँग्रेस 09 राष्ट्रवादी 44 मनसे 2 सेना 9 एमआयएम 1 एकूण 164

संबंधित बातम्या :

पुण्यात महाविकासआघाडीचा भाजपला ‘दे धक्का’, महानगरपालिका निवडणुकीत भाजप बहुमतापासून दूर राहणार?

Special Report : पुणे महापालिका निवडणूक; राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा, शिवसेनेची 80 जागांची मागणी, तर भाजपची जबाबदारी बापटांवर

Allegations between BJP and NCP leaders on the backdrop of Pune Municipal elections

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.