राष्ट्रवादीचं ठरलं! शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढणार; ‘या’ नेत्याची माहिती

Amol kolhe on Loksabha Election 2024 : शरद पवार यांचा 'तो' आदेश अन् शिरूरमधून अमोल कोल्हे यांची उमेदवारी फिक्स?

राष्ट्रवादीचं ठरलं! शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढणार; 'या' नेत्याची माहिती
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 1:28 PM

पुणे : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात कोणता पक्ष कुणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच राष्ट्रवादीच्या गोटातून महत्वाची बातमी समोर आली आहे. शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. अमोल कोल्हेच लोकसभेचे उमेदवार असणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी दिली आहे.

विलास लांडे काय म्हणाले?

अमोल कोल्हे राष्ट्रवादीकडून शिरूर लोकसभा निवडणूक लढणार आहेत. अमोल कोल्हेंना पुन्हा निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवारांनी आज आढावा बैठक घेतली या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली, अशी माहिती विलास लांडे यांनी दिली आहे.

अमोल कोल्हे म्हणतात…

शरद पवारांनी आज राष्ट्रवादीच्या नेत्यांशी-पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी एकूण या कामकाजाचा आढावा घेतला. त्यांना मी मागील चार वर्षांच्या काळातील कामकाजाबद्दल माहिती दिली, असं अमोल कोल्हे म्हणालेत.

शरद पवारसाहेबांनी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण अंतिम निर्णय योग्यवेळी ते घेतील. साहेब सांगतील ते धोरण, अन् साहेब बांधतील ते तोरण!, असं अमोल कोल्हे म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भोसरीमध्ये पोस्टरबाजी पाहायला मिळाली. शिरूर लोकसभा मतदारसंघात लांडेंकडून बॅनरबाजी करण्यात आली होती. या बॅनर्सवर विलास लांडे भावी खासदार, असं लिहिण्यात आलं होतं. तर या पोस्टरवर संसदेचा फोटोही होता. त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार नक्की कोण असणार? याची चर्चा होत होती. मात्र आता आज विलास लांडे यांनीच अमोल कोल्हे हे उमेदवार असतील अशा सूचना असल्याचं सांगितलं आहे.

पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महत्त्वाच्या बैठका होत आहेत. पुणे जिल्हा ग्रामीण आणि लोकसभा मतदारसंघाच्या स्वतंत्र बैठका होत आहेत. पुणे जिल्हा ग्रामीणच्या बैठक झाली. या बैठकीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार,खासदार उपस्थित आहेत. तर राज्यातील काही लोकसभेच्या मतदारसंघातील शरद पवार आढावा घेत आहेत. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत.

शिरूर लोकसभेनंतर आता भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा सुरू झाला आहे. स्वतः शरद पवार आज बैठकीत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतं आहेत. संभाव्य उमेदवारांवरतीही बैठकीत चर्चा सुरू आहे. तसंच जालना लोकसभा मतदारसंघाची बैठक सुरू आहे. बैठकीला राजेश टोपे उपस्थित आहेत.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.