जीवे मारण्याच्या धमकी आल्यावर छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, शरद पवार…
Cabinet Minister Chhagan Bhujbal Death Threat : जीवे मारण्याच्या धमकी येताच छगन भुजबळ म्हणाले, शरद पवार...
पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छगन भुजबळांना फोनवरून जीवे मारण्याची देण्यात आली आहे. या धमकीनंतर भुजबळ यांनी पुण्यात माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी या धमकी प्रकरणावर सविस्तर भाष्य केलं. ही प्रतिक्रिया देताना भुजबळांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नाव घेतलं आहे.
मला जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. पवार कुटुंब अशा गोष्टी करत नाहीत. शरद पवार तर मुळीच कधी अशा गोष्टी करत नाहीत. पवार धमकी देण्याची काम करत नाहीत. तर ते वैचारिक लढाई लढतात, असं छगन भुजबळ म्हणालेत. अतिउत्साही लोक अशा धमक्या देण्याचं काम करतात, असंही ते म्हणाले.
धमकी प्रकरण
मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्याच्या फोनवर धमकीचा फोन आला होता. या फोनवर भुजबळ यांना आपण जीवे मारणार आहोत. तशी सुपारी आपल्याला मिळाली आहे, असं तो तरूण सांगत होता.
छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर पोलिसांकडून तपास केला जात आहे. या तपासात पुण्यातील एका तरूणाला पुणे पोलिसांकडून अटकही करण्यात आली आहे. तसंच भुजबळांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.
भुजबळ म्हणाले…
धमकी प्रकरणावर भुजबळांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही भुजबळांना मारणार आहोत. अशी धमकी दिली गेली आहे. त्यानं नावं पण सांगितलं आहे. आमच्या लोकांनी पोलिसांना हे सगळं कळवलं आहे. पोलीस या सगळ्याचा तपास करत आहेत. काय कारणं आहे ते शोधतील, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
मागच्या वर्षभरापासून मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला आहे. 2 जुलैला झालेल्या शपथविधीत राष्ट्रवादीच्या आमदारांना संधी देण्यात आली. मात्र शिवसेनेच्या आणि भाजपच्या नेत्यांना या विस्तारात संधी मिळाली नाही. त्यामुळे आगामी काळात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. त्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर भाष्य
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेतील. लवकरच पुढचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं भुजबळ म्हणालेत.
अजित पवार गटातील नेत्यांचा शपथविधी झाला असला तरी खातेवाटप मात्र झालेलं नाही. त्यावरही छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. खातं कोणालाचं भेटलं नाही. मविआत असतानाही एक महिन्यानंतर खातेवाटप झालं होतं. आताही लवकरच खातेवाटप होईल, असं भुजबळ म्हणाले.