शरद पवार मोठे नेते, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कार्यकर्त्यावर बोलू नये-चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar Resignation : 'तो' भाजपचा डाव नव्हता!; राजकीय वर्तुळातील चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण

शरद पवार मोठे नेते, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कार्यकर्त्यावर बोलू नये-चंद्रशेखर बावनकुळे
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 1:17 PM

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाष्य केलंय. शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याला बावनकुळे यांनी उत्तर दिलंय. शरद पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. त्यांनी तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कार्यकर्त्यांवर असं काही बोलू नये. पवार साहेबांनी त्यांच्यावर बोलू नये असं मला वाटतं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

‘तो’ भाजपचा डाव नव्हता!

2 मेला शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर 5 मेला त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांच्या राजीनाम्या मागे भाजपचा कुठलाही डाव नव्हता, असं बावनकुळे म्हणाले आहेत.

अजित पवार यांचा मागच्या चार महिन्यापासून माझा संपर्क झाला नाही किंवा ते आमच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात नाहीत हेच मी सांगत होतो. त्यांच्या महाविकास आघाडीकडूनच अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी काही तीन दिवस झाले ते सगळं स्क्रिप्टेड होतं. शरद पवार साहेबांनी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष होण्यासाठी घटना बदलली. राज्यात अशा अनेक शिक्षण आणि सहकारी संस्था आहेत. ज्यांच्या घटना बदलून शरद पवार अध्यक्ष झाले आहेत. शरद पवार दुसऱ्याला कसं पक्षाचा अध्यक्ष होऊ देतील? राष्ट्रवादीचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी आणि घरगुती तमाशा होता, असं बावनकुळे म्हणालेत.

कर्नाटक निवडणुकीवर भाष्य

कर्नाटकात सध्या निवडणूक होतेय. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यावर बावनकुळे यांनी भाष्य केलंय. कर्नाटकात भाजपला निवडून येण्यासाठी कुणाचीही गरज नाही. मोदींच्या नेतृत्वात आम्ही कर्नाटक जिंकू तिथे भाजपचे सरकार येईल. भाजप कमळाच्या समोर कॉम्प्रमाईज करत नाही. मराठी भाषेला आणि मराठी माणसाला न्याय देण्याची आमची भूमिका कायम आहे. पण पक्ष आणि पक्षाचा नेता आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कर्नाटकात विजय भाजपचाच होईल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

आगामी निवडणुकांवर भाष्य

आम्ही संपूर्ण 288 विधानसभा मतदार संघात बैठका घेत आहोत. आम्ही घर चलो अभियान राबवत आहोत. पक्ष संघटनेच काम मजबूत करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, असं बावनकुळे म्हणालेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.