सगळेच राजकीय नेते माजले आहेत; ‘स्वराज्य’च्या मंचावरून संभाजीराजे यांची जोरदार टीका
Sambhajiraje Chhatrapati on Swarajya Bhavan : 'स्वराज्य'ची स्थापना, पुढची ध्येय आणि सध्याचं राजकारण; संभाजीराजे नेमकं काय म्हणाले?
पुणे : संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापित केलेल्या ‘स्वराज्य’ संघटनेसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. ‘स्वराज्य’ संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं पुण्यात आज उद्घाटन झालं. त्यानंतर शोभायात्राही काढण्यात आली. ‘स्वराज्य’ संघटनेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडत आहे. या अधिवेशनात बोलताना संभाजीराजे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ‘स्वराज्य’ संघटना स्थापना करण्याची कारणं, पुढची ध्येय, सध्याचं राजकारण आणि आगामी निवडणुकांवरही संभाजीराजे यांनी भाष्य केलंय.
निवडणूक लढणार अन् जिंकणार!
स्वराज्य संघटना कुठल्याही परिस्थितीत 2024 ला निवडणूक लढवणारच आहे. तयारीला लागा आपण निवडणुका लढू आणि जिंकू सुद्धा, असं संभाजीराजे म्हणालेत. 2% शिवाजी महाराज यांच्यासारखा विचार केला तर आपण स्वराज्य सत्तेत आणू. प्रत्येक सुसंस्कृत नेता स्वराज्यात येणारच. घाबरायची गरज नाही, असंही संभाजीराजे म्हणालेत.
महराजांना देखील स्वराज्य स्थापन करताना अनेक अडचणी आल्या. पण महाराजांनी स्वराज्य स्थापन केलंच. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यचा मूलमंत्र आपल्याल दिला आहे. आजसुद्धा अनेक प्रस्थापित लोक आपल्याला त्रास देतायत. ती माजली आहेत. चूक त्यांची नाही कारण आपण त्यांना निवडून देतो, असं म्हणत संभाजीराजे यांनी राजकीय नेत्यांवर टीका केलीये.
स्वराज्यवर भाष्य
राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आज सर्व शिलेदार पुण्यात आले आहेत. माझ्या जीवनातील आज मोठा प्रसंग आहे. आज आपलं पाहिलं अधिवेशन होत आहे. मी महाराष्ट्र कसा पिंजून काढला यावर बोलणार नाही. मागच्या वर्षी आपल्या संघटनेची घोषणा मी केली आणि केवळ आठ महिन्यांत स्वराज्य संघटना उभी राहिली. पक्षाची संघटनेची बांधणी कुठून सुरू कार्याची हा मोठा प्रश्न आमच्या समोर होता. आपली कुलस्वामिनी आई तुळजभवानीच्या तिथं सूरू केली संघटनेची पहिली शाखादेखील तुळजापूरमध्ये काढली. गाव तिथं शाखा आणि घरोघरी हा संकल्प घेउन राज्यभर फिरलो. संघटना वाढवणे केवळ हाच उद्देश होता, असं संभाजी राजे म्हणालेत.
350 वर्षा नंतरदेखील महाराजांचा वंशज लोकांना भेटायला जातो. लोकांच्या आशा अपेक्षा वाढल्या होत्या. लोकं मला म्हणायची स्वराज्यच्या माध्यमातून आमच्या अडचणी दूर करा. राजेंनी पुण्यात स्वराज्य स्थापन केलं. छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्याच सुराज्य केलं आणि आज ही संघटना स्थापन करताना देखील तेच ध्येय अम्ही ठेवलं आहे, असंही संभाजीराजे म्हणालेत.