SHARAD PAWAR | धुळे-नंदुरबारच्या निकालाचं आश्चर्य नाही, पुणे-नागपूरचे निकाल म्हणजे महाविकास आघाडीला लोकांचा पाठिंबा- शरद पवार

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील महाविकास आघाडीचा विजय म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणाच्या बदलत्या चित्राला लोकांचा असलेला पाठींबा होय, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

SHARAD PAWAR | धुळे-नंदुरबारच्या निकालाचं आश्चर्य नाही, पुणे-नागपूरचे निकाल म्हणजे महाविकास आघाडीला लोकांचा पाठिंबा- शरद पवार
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 5:48 PM

पुणे: “धुळे आणि नंदुरबारचा निकाल आश्चर्यकारक नाही. कारण त्या ठिकाणचे उमेदवार हे विद्यमान आमदार होते. त्यांनी पक्षांतर केल्यामुळे राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांचा विजय खरा विजय म्हणता येणार नाही. पण बाकीच्या ठिकाणचा निकाल हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा आणि गेल्या वर्षभरात केलेल्या कामाला मतदारांनी दिलेली पावती आहे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.(Sharad Pawar on mahavikas aghadi win)

पुणे, नागपूर आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे. ‘नागपूर पदवीधर मतदारसंघ 5 दशकं भाजपकडे होता. गडकरी आणि फडणवीस यांच्याकडे ही जागा गेली अनेक वर्ष होती. पुण्यातील पदवीधर मतदारांनीही आम्हाला समर्थन दिलं नव्हतं. पण यंदा पुण्याचा निकालही मोठ्या मतांनी स्पष्ट झाला आहे. या बदल म्हणजे महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे. या बदलाला महाराष्ट्रातील लोकांचा पाठींबा आहे, असंच या निकालातून पाहायला मिळत आहे’, असं शरद पवार म्हणाले.

चंद्रकांत पाटलांना पवारांचा टोला

‘चंद्रकांत पाटील यांचा विनोदी विधान करणाचा लौकिक आहे. मागच्यावेळी आमच्यामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार होते त्यामुळे ते विजयी झाले. यावेळी त्यांना अंदाज होता म्हणून त्यांनी पुणे शहरातील त्यांच्या दृष्टीनं सोयीचा मतदारसंघ निवडला. चंद्रकांत पाटील यांना विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ बदलला नसता’, असा टोला शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला महत्व देण्याची गरज नसल्याचंही पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

हिंमत असेल तर एकटे लढा- चंद्रकांत पाटील

पुणे आणि नागपूर पदवीधरची जागा गमावल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकएकटे लढा असं आव्हान महाविकास आघाडीतील घटकपक्षांना केलं आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचं खच्चीकरण झालंय. तर राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली आहे, असं वक्तव्य करत त्यांनी शिवसेनेला एकप्रकारे सूचक इशाराच दिलाय. तर पुण्यात आणि नागपुरात अपक्ष उमेदवाराने अजून काही मतं घेतली असती तर विजय आमचाच होता, असं म्हणत पाटील यांनी आपला पराभव मान्य केला आहे.

संबंधित बातम्या:

महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ, पुणे, नागपूर, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात विजयाचा गुलाल, भाजपचा दारुण पराभव!

भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड? नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयाच्या उंबरठ्यावर

पुणे आणि नागपूर पदवीधरमध्ये भाजपला मोठा धक्का!, हिंमत असेल तर एकटे लढा, चंद्रकांत पाटलांचं सत्ताधाऱ्यांना आव्हान

Sharad Pawar on mahavikas aghadi win

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.