AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arvind Kejriwal : आप पक्षाला सुरूंग, पंजाबमध्ये जबर धक्का, निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने डाव टाकला!

आता हे दोन्ही आमदार भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. चंदीगड येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होणार आहे. याच सभेत दोन्ही आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत, असं बोललं जातंय.

Arvind Kejriwal : आप पक्षाला सुरूंग, पंजाबमध्ये जबर धक्का, निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने डाव टाकला!
arvind kejriwalImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 01, 2026 | 3:52 PM
Share

AAP MLA Resignation : पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत 2027 साली येथे निवडणूक होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीचा तयारी सत्ताधारी आम आदमी पार्टी तसेच विरोधी बाकावरील भाजपाने सुरू केली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही पक्षांनी पूर्ण ताकद लावली आहे. आप पक्षाने तर आपल्या उमेदवारांची पहिली यादीदेखील जाहीर केली आहे. असे असतानाच आता आप पक्षाला जबर धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपच्या दोन आमदारांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय.

पक्षाला धक्का, दोन आमदार भाजपात जाणार

आप पक्षाला जबर धक्का बसला आहे. पटियाला हलका सनौरचे आमदार हरमीतसिंग पठाण माजरा आणि समानाचे आमदार तथा माजी मंत्री चेतनसिंग जोडा माजरा यांनी आप पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. शनिवारी (31 ऑक्टोबर) आप पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी 40 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत दोन्ही आमदारांचे नाव नव्हते. त्यानंत नाराज होऊन या आमदारांनी आपल्या आप पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला.

दोन्ही आमदार भाजपात प्रवेश करणार

आता हे दोन्ही आमदार भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. चंदीगड येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होणार आहे. याच सभेत दोन्ही आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत, असं बोललं जातंय.

आपल्या राजीनाम्याबाबत चेतनसिंग यांनी फेसबुकवर माहिती दिलीय. मी आम आदमी पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा देतोय, असं त्यांनी फेसकबुक पोस्टमध्ये सांगिलंय. अशाच प्रकारची फेसबुक पोस्ट हरमितसिंग पठाणमाजरा यांनी केलीय.

दोन आमदारांनी पक्षाचा राजीनामा देताच आपचे माध्यम प्रमुख बलतेज पन्नू यांनी आपली भूमिका मांडली आहे. या दोन्ही आमदारांना पक्षाने अगोदरपासूनच बाजूला सारलेले होते. ते आता भाजपात जाणार आहेत, असे पन्नू यांनी सांगितलेय.

आप पक्षाने 40 उमेदवार जाहीर केले

दरम्यान, आप पक्षाने आपल्या 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आता लवकरच पुढची यादीही पक्षातर्फे जारी केली जाणार आहे. आप पक्ष साधारण 40 विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?