पंजाबमध्ये आपचा ‘झाडू’ फिरला, महाराष्ट्र आणि देशात किती संधी? जाणून घ्या टीव्ही 9 चा पोल
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनाही पराभवाची चव चाखावी लागलीय. या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपली महत्वाकांक्षा स्पष्ट करत आता देशभरात इन्कलाब होईल असं म्हटलंय. या पार्श्वभूमीवर आगामी काळात महाराष्ट्रात काँग्रेसला किती संधी आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही पोलद्वारे केलाय.
मुंबई : दिल्लीतील सत्ताधारी आम आमदी पक्षाने (Aam Adami Party) सीमोल्लंघन करत पंजाबमध्ये जोरदार झाडू फिरवत काँग्रेसचा सुपडा साफ केलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि भगवंत मान (Bhagwant Man) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पंजाबच्या जनतेचं आपल्या पदरात घवघवीत यश टाकलं. पंजाबमध्ये आपन तब्बल 92 जागांवर आघाडी घेतलीय. तर काँग्रेसला केवळ 18 जागांवर समाधान मानावं लागलंय. इतकंच नाही तर विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी (CharanjitSingh Channi) यांचा दोन्ही मतदारसंघात पराभव झालाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनाही पराभवाची चव चाखावी लागलीय. या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपली महत्वाकांक्षा स्पष्ट करत आता देशभरात इन्कलाब होईल असं म्हटलंय. या पार्श्वभूमीवर आगामी काळात महाराष्ट्रात काँग्रेसला किती संधी आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही पोलद्वारे केलाय.
आम्ही यूट्युब पोलद्वारे प्रेक्षकांना प्रश्न विचारला की ‘आप’ हा देशात काँग्रेसची जागा घेणार का? यावर पाच तासात एक लाखापेक्षा अधिक नागरिकांनी आपलं मत मांडलं. त्यात 64 टक्के नागरिकांनी होय आम आदमी पक्ष देशात काँग्रेसची जागा घेईल असं म्हटलंय. तर 27 टक्के लोकांना आप काँग्रेसची जागा घेणार नाही असं वाटतंय. 9 टक्के लोक मात्र सांगता येत नाही असं म्हणत आहेत.
तर यूट्युब कम्युनिटीवर आम्ही महाराष्ट्रातील आगामी मनपा आणि झेडपी निवडणुकीत आपला संधी आहे असं वाटता का? असा सवाल केला. या पोलमध्ये 55 हजारापेक्षा अधिक लोकांनी सहभागी घेतला. तेव्हा 62 टक्के नागरिकांनी आपला महाराष्ट्रात संधी नसल्याचं म्हटलंय. 34 टक्के लोकांना वाटतं की आप महाराष्ट्रातही किमया करु शको. तर 4 टक्के नागरिक सांगता येत नाही असं म्हणत आहेत.
आपमध्ये प्रवेश करण्याचं केजरीवालांचं आवाहन
पंजाबमधील विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी महिला, युवक, शेतकरी, गरीब जनता अशा सर्वांना आम आदमी पार्टीत प्रवेश करण्याचं आवाहन केलंय. आज मोबाईल रिपेअर करणाऱ्या दुकानात नोकरी करणाऱ्या व्यक्तीने चरणजितसिंह चन्न यांचा पराभव केलाय. आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता नवज्योतने मजीठिया यांचा पराभव केला, सिद्धू यांचाही पराभूत केला. त्यामुळे आता आम आदमी पार्टीत प्रवेश करण्याचं आवाहन केजरीवाल यांनी जनतेला केलंय.
इतर बातम्या :