Rohit Patil | आबांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, पुत्र रोहित पाटील यांच्यासह दोघे बाधित

आर. आर. आबा यांचे सुपुत्र रोहित पाटील आणि बंधू सुरेश पाटील या दोघांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

Rohit Patil | आबांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, पुत्र रोहित पाटील यांच्यासह दोघे बाधित
Follow us
| Updated on: Sep 06, 2020 | 12:31 PM

सांगली : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आर. आर. आबा यांचे सुपुत्र रोहित पाटील आणि बंधू सुरेश पाटील या दोघांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सुदैवाने आबांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील आमदार सुमन पाटील यांचा अहवाल निगेटिव्ह आला. (R R Patil Son Rohit Patil tested COVID Positive)

सुरेश पाटील आणि रोहित पाटील या दोघांचे अहवाल गुरुवारी दुपारी मिळाले. त्यानंतर दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती ठीक असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. आमदार सुमनताई पाटील यांचीही स्वॅब तपासणी केली होती, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला.

तासगावमध्ये बुधवारी झालेल्या कोव्हिड उपचार केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात रोहित पाटील सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटीलही हजर होते. त्यामुळे संपर्कात आलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय तपासणी करावी, असे आवाहन रोहित पाटील यांनी केले आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. इस्लामपूरमध्ये आधीच जनता कर्फ्यू लावला असताना पाठोपाठ जिल्ह्यातील पलुस नगरपरिषदेनेही पाच दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसरीकडे, मिरजेतील शासकीय कोव्हिड रुग्णालयातील 50 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, तर काही जणांना विलगीकरणात पाठवण्यात आले आहे. (R R Patil Son Rohit Patil tested COVID Positive)

मार्चपासून ऑगस्टपर्यंत रुग्णालयातील कोणालाही कोरोनाची लागण झाली नव्हती, ऑगस्टमध्ये काही सहयोगी प्राध्यापक, निवासी डॉक्टर  आणि परिचारिकांना करोनाची लागण झाली होती, आता मात्र तब्बल 50 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

संबंधित बातम्या :

‘मी कोव्हिड पॉझिटिव्ह, लवकरच आपल्या सेवेत हजर राहीन’, सदाभाऊ खोत यांना कोरोना संसर्ग

रोहित पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड करा, कार्यकर्त्यांचं शरद पवारांना पत्र

(R R Patil Son Rohit Patil tested COVID Positive)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.