नरेंद्र मोदी खरं तर ‘सरेंडर’ मोदी, राहुल गांधी यांचा निशाणा

राहुल गांधी यांनी शनिवारीही पंतप्रधानांवर चिनी आक्रमणास 'शरण गेल्याचा' आरोप केला होता (Rahul Gandhi Criticizes Narendra Modi as Surrender Modi)

नरेंद्र मोदी खरं तर 'सरेंडर' मोदी, राहुल गांधी यांचा निशाणा
Follow us
| Updated on: Jun 21, 2020 | 1:13 PM

नवी दिल्ली : चीनबरोबर वाढत्या तणावाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा हल्लाबोल चढवला. मोदींनी बीजिंगला ‘शरण’ गेल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. नरेंद्र मोदी हे खरं तर ‘सरेंडर’ मोदी आहेत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी टीका केली. (Rahul Gandhi Criticizes Narendra Modi as Surrender Modi)

‘जपान टाईम्स’मधील एका लेखाची लिंक शेअर करत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘नरेंद्र मोदी हे खरं तर सुरेंदर मोदी आहेत’ असे राहुल गांधी यांनी ट्विटरवर लिहिले आहे. नरेंद्र या नावाशी साधर्म्य असलेले ‘सुरेंदर’ (Surender) असे नाव त्यांनी लिहिले असले, तरी सरेंडर (Surrender किंवा शरणागती) या अर्थाने ते लिहिल्याचे बोलले जाते. ‘चीनबाबत भारताचे तुष्टीकरण धोरण उलगडले’ या विषयावर ‘जपान टाईम्स’मध्ये लेख आहे.

(Rahul Gandhi Criticizes Narendra Modi as Surrender Modi)

राहुल गांधी यांनी शनिवारीही पंतप्रधानांवर चिनी आक्रमणास ‘शरण गेल्याचा’ आरोप केला होता. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर राहुल गांधी यांनी टीकेची झोड उठवली होती. चीनने भारताच्या जमिनीवर घुसखोरी केली नसल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत केला होता. गलवानच्या खोऱ्यात चीनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले.

हेही वाचा : गलवान खोऱ्यात चिनी घुसखोरीवरुन काँग्रेसचे प्रश्न, पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्टीकरण

पंतप्रधानांनी चीनच्या आक्रमकतेनंतर भारतीय भूमी सोपवली. जर चीनची ती भूमी असेल, तर आपले जवान कसे शहीद झाले? आणि हे जवान कुठे शहीद झाले? असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले होते.

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा विपर्यास करुन, त्यांची विधाने मोडतोड करुन आरोप केले जात आहेत, असं पीएमओने त्यानंतर स्पष्ट केलं.  लाईन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोल (LAC) वर भारतीय सैन्याच्या 16 बिहार रेजिमेंटच्या जवानांनी चीनचा डाव उधळून लावला. त्यामुळेच चीनला आपल्या सीमेत घुसता आलं नाही, असंही पीएमओने स्पष्ट केलं. (Rahul Gandhi Criticizes Narendra Modi as Surrender Modi)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.