AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी फडणवीस, बावनकुळे अन् आता अमित शाह राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता, भाजप-मनसे युतीची चिन्हे?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात भेट होण्याची शक्यता आहे. अमित शाह लवकरच मुंबई दौरा करणार आहेत. या दौऱ्यावेळी ते राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे.

आधी फडणवीस, बावनकुळे अन् आता अमित शाह राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता, भाजप-मनसे युतीची चिन्हे?
| Updated on: Sep 02, 2022 | 11:59 AM
Share

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवणारी बातमी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात भेट होण्याची शक्यता आहे. अमित शाह (Amit Shah) लवकरच मुंबई दौरा करणार आहेत. या दौऱ्यावेळी ते राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे. काही दिवसांआधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली होती. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या भेटीची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी भाजप मनसेच्या युतीची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट

राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटी वाढलेल्या असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काल राज ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी शीवतीर्थवर जात गणपतीचं दर्शन घेतलं.

भाजप-मनसे युती होणार?

शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मधल्या काळात त्यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलून भगवा केला. भाजपने शिंदेगटासोबत सरकार स्थापन केल्यानंतर मनसे-भाजपची सलगी वाढताना दिसतेय. अश्यात आता मनसे आणि भाजपची युती होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढत्या भेटीगाठी पाहता मुंबई महापालिका निवडणुकीआधी मनसे-भाजप युती झाली तर वावगं वाटायला नको.

युती झाल्यास काय?

मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. अश्यात मनसे आणि भाजपची युती झाली तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदान करणारा मतदारवर्ग आपली मतं युतीच्या पारड्यात टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचा फायदा होईल तर शिवसेनेला आपल्या बालेकिल्ल्यात फटका बसण्याची शक्यता आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.