Raj Thackeray Aurangabad Sabha : भोंगे आणि हिंदुत्वावरून राज ठाकरे आक्रमक भूमिका मांडणार, सभेला विक्रमी गर्दी होण्याचा अंदाज
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे टोमणे मारत म्हणाले, 'राज ठाकरेंनी बाळासाहेबांसारखा पेहराव करून स्वतःला आपल्यासारखे समजायला सुरुवात केली आहे.
औरंगाबाद – राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) औरंगाबादमधील सभेला (Aurangabad Sabha) परवानगी मिळाली नव्हती, त्यामुळे सभा होईल की नाही अशी अनेकांना शंका होती. परंतु औरंगाबाद पोलिसांनी एक नियमावली जाहीर राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad Police)काही दिवसांपुरती जमावबंदी लागू केली आहे. आज सायंकाळी राज ठाकरे यांची सभा औरंगाबादमध्ये होईल. सभेला विक्रमी गर्दी होण्याचा अनेकांनी अंदाज व्यक्त केला आहे. भोंगे आणि हिंदुत्वावरून राज ठाकरे आपल्या आक्रमक शैलीत भूमिका मांडण्याची शक्यता आहे. संपुर्ण महाराष्ट्राला राज ठाकरेंच्या सभेची उत्सुकता लागली आहे. औरंगाबादला सभेला जाण्यापुर्वी त्यांनी पुण्यात काही ठिकाणी भेटी दिल्या आहेत. तर काल औरंगाबादमध्ये सुध्दा काही महत्त्वाच्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत. अनेक पक्षांनी राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती. मनसेचे मोठे नेते औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत.
राज ठाकरे यांनाही आपण बाळासाहेब ठाकरेंसारखे आहोत असे वाटू लागले
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे टोमणे मारत म्हणाले, ‘राज ठाकरेंनी बाळासाहेबांसारखा पेहराव करून स्वतःला आपल्यासारखे समजायला सुरुवात केली आहे.’ राज ठाकरे हे भाजपची ‘बी’ टीम नसून ‘डी’ टीम असल्याचंही ते म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री खासदारांची बैठक बोलावली होती. याच बैठकीत शिवसंपर्क अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील अनुभवावर ते खासदारांशी संवाद साधत होते. उद्धव पुढे म्हणाले की, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातील ‘मुन्नाभाई’ गांधीजींना गांधीजींसारखे बोलू शकतात असा भ्रम देतो. तसेच राज ठाकरे यांनाही आपण बाळासाहेब ठाकरेंसारखे आहोत असे वाटू लागले आहे.
भाजप आणि मनसेचे हिंदुत्व खोटे आहे
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘शिवसेनेने अयोध्येत राम मंदिरासाठी आंदोलन सुरू केले. त्यावेळी मनसे काय करत होती, बाबरी मशीद प्रकरणात राज ठाकरे कुठे होते. उद्धव ठाकरे यांनीही भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हिंदुत्व बनावट आहे. यासोबतच त्यांनी विरोधकांचे ‘नव-हिंदू’ असे वर्णन करून भाजप आणि मनसेशी आक्रमकपणे मुकाबला करावा लागेल, असे सांगितले.