Raj Thackeray : ‘हिंदू की बात, देश पे राज’, औरंगाबादच्या सभेसाठी पुण्यात बॅनरबाजी, सभा होणार म्हणजे होणारच ?

औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी 25 मे रोजी जमावबंदी आदेश दिले आहेत. पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनी होणार्‍या मनसे प्रमुखांच्या रॅलीची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जात आहे.

Raj Thackeray : 'हिंदू की बात, देश पे राज', औरंगाबादच्या सभेसाठी पुण्यात बॅनरबाजी, सभा होणार म्हणजे होणारच ?
औरंगाबादच्या सभेसाठी पुण्यात बॅनरबाजीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 8:59 AM

पुणे – औरंगाबादमधील (aurangabad) 1 तारखेच्या सभेची मनसेकडून (mns) जोरदार तयारी सुरू आहे. मनसे काही महत्त्वाचे नेते औरंगाबादमध्ये दाखल झाले असून सभा होणार असल्याचे सांगत आहेत. अद्याप मनसेच्या होणाऱ्या सभेला परवानगी मिळाली नसल्याचे माहिती आहे. परंतु मनसेचे कार्यकर्ते तिथं सभा होणार असल्याचे सांगत आहेत. राज ठाकरेंचे (raj thackeray) हिंदूजननायक नावाचे बँनर पुण्यात लावले आहेत. त्यामुळे पुण्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मनसैनिकांकडून राज ठाकरेंना हिंदूजननायक पदवी देण्यात आली आहे. हिंदू की बात करेगा वही देश पे राज करेगा अशा आशयाचे बँनर्स पुण्यात महत्त्वाची ठिकाणी लावले आहेत. पुण्यातून मोठ्या संख्येनं मनसैनिक औरंगाबादला जाणार आहेत. पुण्यात साने गुरुजी चौकात बॅनर लावण्यात आले आहेत. राज ठाकरे हिंदूजननायक असा मोठा आशय बॅनरमध्ये लिहीण्यात आला आहे. औरंगाबाद पोलिस आयुक्तांनी जमावबंदी लागू केल्याने सभा होणार की, नाही याबाबत अद्याप पोलिसांनी अधिकृत कसल्याची प्रकारची माहिती जाहीर केलेली नाही.

औरंगाबादमध्ये जमावबंदी

औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी 25 मे रोजी जमावबंदी आदेश दिले आहेत. पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनी होणार्‍या मनसे प्रमुखांच्या रॅलीची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जात आहे. राज ठाकरेंनी गुढी पाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणात महाविकास आघाडी सरकारवरती जोरदार शाब्दिक हल्ला केला. तसेच मशिदीवरील भोंगे तात्काळ हटवा अन्यथा आम्ही मशिदीसमोर हनुमान चाळिसा लागणार अशी भूमिका जाहीर केली. तेव्हापासून राज्यातलं राजकारण तापलं आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेला अनेक राजकीय नेत्यांनी विरोध केला आहे. हनुमान चालीसाच्या पठणाच्या कार्यक्रमाला अनेक कार्यकर्ते विरोध करणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या या सभेला अनेक नेत्यांनी विरोध केला आहे.

औरंगाबादमधील लागू असलेले निर्बंध

एखादी व्यक्ती शस्त्रे, तलवारी, काठ्या, बंदुका आणि इतर कोणतीही वस्तू बाळगू शकत नाही. ज्यामुळे शारीरिक इजा होऊ शकते.

एखादी व्यक्ती कोणतेही ज्वलनशील पदार्थ घेऊन फिरू शकत नाही.

कोणतीही घोषणा करता येत नाही. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणारी गाणी वाजवू नका.

कोणतेही भाषण करू नका, कोणतेही हातवारे करू नका, चित्रे काढू नका किंवा राज्याची सुरक्षा धोक्यात आणणारी पोस्टर्स दाखवू नका किंवा राज्य उलथून टाकण्याची मानसिकता दर्शवू नका.

कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्याची परवानगी नाही.

निदर्शने आणि धरणे यांना परवानगी नाही.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.