पुण्यातून निघण्यापूर्वीच राज ठाकरेंचा पुढचा दौरा ठरला, 8 दिवसांनी ‘मी पुन्हा येईन’!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray Pune) हे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज या दौऱ्याचा शेवटचा दिवस असला तरी राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरला आहे.

पुण्यातून निघण्यापूर्वीच राज ठाकरेंचा पुढचा दौरा ठरला, 8 दिवसांनी 'मी पुन्हा येईन'!
पुणे महापालिकेसाठी मनसेची तयारी
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 1:50 PM

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे  (Raj Thackeray Pune) हे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज या दौऱ्याचा शेवटचा दिवस असला तरी राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरला आहे. आठ दिवसांनी म्हणजे 30 जुलैला राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

सध्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे 30 जुलैपासून पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. 30 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान राज ठाकरे यांचा पुणे दौरा असणार आहे. राज ठाकरे यांनी यादरम्यान पुण्यातील विकास कामाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांना घरी येण्याचे निमंत्रणही दिले आहे.

त्याचबरोबर मनसे शहरात राजदूतांची नेमणूकही करणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आहे.

राज ठाकरेंच्या मॅरेथॉन बैठका

दरम्यान, आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. नाशिकनंतर पुण्यात आलेल्या राज ठाकरे यांचा ‘राजसंवाद’ हा दौरा सुरु आहे. दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस असून राज ठाकरे मॅरेथॉन बैठका घेत आहे. मोठ्या उत्साहात राज ठाकरे यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत केलं जात आहे. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी केली जात आहे.

मनसे शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफर

दरम्यान, पुणे महापालिकेत मनसेची चांगली कामगिरी व्हावी म्हणून राज ठाकरे यांनी पक्षाच्या शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफरही दिली. चांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षांच्या घरी मी जेवायला येईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये उभारी भरण्यासाठी राज यांनी ही ऑफर दिली आहे. सध्या पुण्यता मनसे कार्यकर्त्यांमध्ये या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे.

45 जागा निवडून येणारच, मनसेचा दावा

दरम्यान, प्रभार रचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असं मनसे नेते सांगतात. मात्र, शहरातील पक्ष संघटनेचा प्रभावही कमी झाला होता. आगामी 2022 च्या महापालिका निवडणुकीत मनसे सर्व जागा लढवणार आहे. त्यातील 90 जागांवर मनसेनं लक्ष केंद्रीत केल्याचं सांगतानाच 45 जागा निवडून येणारच असा दावा मनसेचे नेते करत आहेत.

पुणे महापालिकेतील पक्षीय बलाबल

भाजप – 99 राष्ट्रवादी – 42 काँग्रेस – 10 सेना – 10 मनसे – 2 एमआयएम – 1 एकूण जागा – 164

संबंधित बातम्या  

स्पेशल रिपोर्ट : राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याने मनसे ‘मिशन 90’ गाठणार? पुणे महापालिकेत कुणाची किती ताकद?

VIDEO | अहो आश्चर्यम! बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीत राज ठाकरे चक्क मास्कमध्ये

(Raj Thackeray , MNS chief to visit Pune again in next 8 days said Vasant More MNS Pune chief)
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.